Viral Video: अपघाताचे अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहे. काही व्हिडीओ पाहिल्यावर देव तारी त्याला कोण मारी या मराठी म्हण आपल्याला आठवते. काही लोकांचं नशीब फार जोरदार असतं. मृत्यू त्यांचा समोर असतो पण नशीबाच्या जोरावर ते मृत्यूला चकवा देतात. सोशल मीडिया सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पाहून तुमचं हृदय हेलावून टाकेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घरातून बाहेर पडताना घरातील वडीलधारी मंडळी कायम सांगतात की, रस्त्यावर चालताना लक्षपूर्वक चाल. मात्र एखाद्याचं नशीब खराब असेल तर तुमची चूक नसतानाही तुम्ही अपघाताचे बळी ठरतात. रस्त्यावरुन जाताना कधी कुठलं वाहन तुम्हाला येऊन धडकेल तुम्ही सांगू शकत नाही. या व्हिडीओमध्ये तरुणासोबत असंच काहीस घडतं. (trending video car accident viral video on social media and person life was saved watch video)


नशीब बलवत्तर!


काही लोकांचे नशीब खूप बलवान असते. मृत्यू त्यांच्यासमोर आहे, पण भक्कम नशिबामुळे त्यांचे केसालाही धक्का लागत नाही. या व्हायरल व्हिडिओमध्येही तेच दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला एक माणूस उभा आहे. तो बहुधा कोणाची तरी वाट पाहत होता. तरुण रस्त्याच्या कडेला रेलिंग धरून उभा आहे आणि पुढच्याच क्षणी तो तिथून निघून जातो.


...आणि पुढे जे झालं पाहून धक्का बसतो


त्याच ठिकाणी एक कार सरळ येऊन रेलिंगला धडकते. कार इतक्या वेगाने धडकली की, रेलिंग पूर्णपणे तुटले. या व्हिडीओमधील कारची स्थिती पाहून तुम्हाला हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येईल. त्या तरुणाचं नशीब बलवत्तर म्हणून त्याने मृत्यूलाही चकवा दिला. सुदैवाने हा तरुण काही सेकंदांपूर्वीच घटनास्थळावरुन निघून गेला होता. अन्यथा काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं. हा धक्कादायक व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. कॅप्शनमध्ये म्हटलं आहे की, ''मुलगा खूप भाग्यवान होता.'' हा व्हिडीओ 25 ऑगस्टला शेअर करण्यात आला आहे.