Emmanuel Macron Viral Video : तुम्ही जेव्हा सेलिब्रिटी असता, देशाचे नेतृत्त्व करतात आणि देशाचे नेते असतात. त्यावेळी तुमच्यावर अख्खा जगाची नजर असते. तुमची एक कृती तुम्हाला वादात अडकवू शकते. तुम्ही लोकांसमोर काय आदर्श ठेवता याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या असतात. अशात तुमची एक चूक तुम्हाला महागात पडू शकते. 


इमॅन्युएल मॅक्रॉन यांची 'ती' चूक 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. या व्हिडीओमुळे मॅक्रॉन हे नेटकऱ्यांचा निशाणावर आहेत. या व्हिडीओमध्ये इमॅन्युएल मॅक्रॉन बिअर पिताना दिसून येतं आहे. त्यांचा या कृत्यामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. 


अवघ्या 17 सेकंदात संपूर्ण बिअर फसतं


फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा हा ट्रे़ंडिंग व्हिडीओमध्ये टूलूस रग्बी टीमच्या ड्रेसिंग रूममधील आहे. टीमला चीअर करण्यासाठी ते इथे आले होते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता राष्ट्राध्यक्ष यांनी बिअरची बॉटल हात घेऊन उघडून हवेत फिरवली आणि पुढच्या 17 सेकंदात ती बॉटल तोंडाला लावून फसतं केली.  (trending video france president emmanuel macron drink beer in 17 second video viral on Social media trolled now )


त्यांचा या कृत्याने खेळाडू भारावून गेले मात्र नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे. या कृत्याचा व्हिडीओ इथे उपस्थितीत खेळाडूंनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. FC च्या अहवालानुसार, टूलूस रग्बी संघाने देशांतर्गत लीग जिंकल्यानंतर झालेल्या सेलिब्रेशनचा हा व्हिडीओ आहे. 
 


नवीन वादाला तोंड 


फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पण काही लोक त्यांच्या समर्थनार्थही कमेंट्स करत आहेत. राष्ट्रपती हा देशाचा आदर्श असतो असा काही यूजर्सचं म्हणं आहे. त्यांनी अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी बिअर प्यायल्यास नशेच्या सवयीला चालना देणारं हे कृत्य अमान्य आहे. 




हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्वीटरवर manishkharya या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. यापूर्वी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, ते दररोज दुपारच्या जेवणासोबत वाइन पितात.