Girl Viral Video : हद्द झाली! तरुणीचा विमानात आंघोळ करतानाचा व्हिडीओ आला समोर...
Viral Video : विमानात तरुणीचा आंघोळ करताना (Girl Viral Video) व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी एकच संताप व्यक्त केला आहे. लाईक्स महिलांनी हद्द पार केली आहे, असंच काहीसा सूर त्यांचा आहे.
Girl Viral Video : सध्या सोशल मीडियाने (Social media video) लोकांना वेड लावलं आहे. काही यूजर्सने या सोशल मीडियाचा नादात हद्द पार केली आहे. लाईक्स आणि कमेंट्ससाठी त्यांनी खाजगी आयुष्यातील क्षण सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. एका तरुणीने विमानात आंघोळ (Shower In Flight) करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर एकच खळबळ माजली आहे. नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे. इंटरनेटवर हा व्हिडीओ (trending Video) धुमाकूळ घालत आहे. तरुणाचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांची झोप उडाली आहे. विमानातील असं कृत्य नेटकऱ्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे. (trending Video girl taking a shower in the plane Video Viral on social media)
विमानात तिचं असं कृत्य!
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तरुणीने विमानातील (Flight viral video) शॉवर सिस्टीमबद्दल सांगितलं आहे. या तरुणीने विमानातील फर्स्ट क्लासमध्ये विमानातील शॉवर (First Class shower spa) सुविधेबद्दल माहिती दिली आहे. विमानात ही सुविधा बूक केल्यास तुम्हाला शॅम्पू- कंडिशनर, साबण, हेअर ड्रायर, तेल, जेल आणि शॉवर कप, बँग इत्यादी गोष्टी तिने दाखविल्या आहेत. विमानातील हा रॉयल लग्झरी पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. हे सगळं दाखवताना या तरुणीने अंगाला टॉवेल गुंडाळला आहे. शिवाय या व्हिडीओमध्ये ती आंघोळ करण्यासाठी जाताना दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे नेटकरी संतापले आहेत. विमानातील सुविधा दाखविण्यासाठी अशाप्रकारे तरुणीने दाखवायला नको होतं असं नेटकऱ्यांचं म्हणं आहे. (world trending news)
व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील luxetravelcouple या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या अकाऊंटवर प्रवाशांदरम्यान मिळणाऱ्या रॉयल सुखसुविधाबद्दल सांगण्यात आलं आहे. या व्हिडीओला लाखोच्या घरात लाईक्स मिळाले आहेत. तर विमान प्रवास हा पहिलेच खूप महाग असतो. त्यानंतर अशाप्रकारच्या सुविधांसाठी लाखो रुपये खर्च करण्याची खरंच गरज आहे का? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. विमानात खरंच आंघोळ करण्याची गरज आहे का?