Trending Video: सोशल मीडिया म्हणजे व्हिडीओचा खजिना आहे. यात अनेक व्हिडीओ आपल्याला रोज पाहिला मिळतात. काही मजेशीर असतात, तर काही धक्कादायक असतात. तरुण पिढीला तर सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी वेगवेगळी शक्कल शोधून काढतं असतात. जीव धोक्यात घालून स्टंट करणे तर त्यांना काही वाटतं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ पाहून आपल्याच पायाखालची जमीन सरकते. या मुलाला हा स्टंट करताना बिलकुल भीती वाटत नाही का असा प्रश्न आपल्याला पडतो. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक तरुण एका गगनचुंबी इमारतीवर चढला आहे. कुठल्याही सुरक्षिततेशिवाय हा तरुण स्टंट करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा तरुण एका बीमवरुन दुसऱ्या बीमवर सहज उभी मारताना दिसत आहे. या तरुणाचा हा स्टंट पाहून आपल्याच हृदयाचे ठोके वाढतात. (trending Video man did stunt at such a place video viral on social media in marathi)


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दोन बीममधील अंतरही खूप जास्त आहे. तरीही हा तरुण जीवाची परवा न करता हा स्टंट करताना दिसत आहे. एक छोटीशी चुकी त्याला किती महागात पडली असती याची कदाचित त्याने कधी कल्पनाही केली नसेल. 


अतिशय धक्कादायक स्टंटचा हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर parkour_tribe या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. वेडेपणा असं या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 11 हजारापेक्षा जास्त लाइक आले आहेत. तर असंख्य यूजर्सने कमेंटही केले आहेत.


तुम्ही जर असं काही स्टंट करत असाल तर एकदा घरच्यांचा विचार करा. जीव एवढा स्वस्त नाही आहे. त्यामुळे उगाचच फक्त प्रसिद्धसाठी नको ते धाडस करु नका.