Viral Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ (Social Media Viral Video) व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ मनोरंजक तर काही व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारे असतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. रियो डी जेनेरियोमधील (Rio de Janeiro Video) एक व्हिडीओ सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आल्याचं पहायला मिळत आहे. (A video of a girl sitting on a mountain in Rio de Janeiro is going viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओमध्ये रियो डी जेनेरियो शहरातील मनमोहक दृष्य पहायला मिळतंय. रियो डी जेनेरियो (Rio de Janeiro) हे निसर्गरम्य शहरांपैकी एक शहर आहे. स्वच्छतेच्या दृष्टीने या शहराचा कोणी हात धरू शकत नाही. तर निळाशार समुद्र शहराची प्रतिमा वाढवतो. 


सध्या व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक गुलाबी ड्रेस घातलेली मुलगी एका उंच अशा डोंगरावर बसलेली पहायला मिळत आहे. ही मुलगी एवढ्या उंचीवर बसली आहे की, एका छोट्या चुकीमुळे तिचा जीव जाऊ शकतो. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या अंगावर देखील काटा आल्याशिवाय राहणार नाही. या डोंगराची उंची समुद्र सपाटीपासून 2769 फूट आहे.


एवढ्या उंचीवर असली तरी मुलीच्या चेहऱ्यावर भीती दिसून येत नाही. हळूहळू पुढे सरकत मुलगी फोटोशूट करताना दिसते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांनी शेअर केला आहे. तब्बल 48 लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे तर 57 हजार लोकांना हा व्हिडीओ आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत मुलीला ऐकवलं.


पाहा व्हिडीओ - 



 


दरम्यान, फोटो किंवा व्हिडीओ काढण्यासाठी जीव धोक्यात घालणं चुकीचं आहे. पर्यटन स्थळावर फोटो काढताना नेहमी सर्वांनी याची काळजी घ्यावी.