VIDEO : ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने शालेय विद्यार्थीनीच्या झिंज्या उपटून मारहाण
Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये शालेय विद्यार्थींचा राडा पाहिला मिळतो. या हाणामारीचं कारण ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
Trending Video : शाळेतील दिवस हे सर्वात सुंदर दिवस असतात. या दिवसांमध्ये शिक्षणासोबत आपण आयुष्यातील अनेक गोष्टी शिकतो. खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चित्रकला अशा अनेक गोष्टी शिकवल्या जातात. सोशल मीडियावर शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ (School Girls Video) पाहिला मिळतात. तरदुसरीकडे मुलींच्या हाणामारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या सोशल मीडियावर शालेय विद्यार्थींच्या मारामारीचा एक व्हिडीओ (fight Video) व्हायरल होतो आहे. या हाणामारीमागचं कारण कळल्यानंतर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.
...म्हणून विद्यार्थीनीला मारहाण
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तीन मुली त्यांचा वर्गमैत्रीणीला झिंज्या उपटून जमिनीवर पाडून मारताना दिसतं आहे. त्या मुलीच्या अंगावर एक मुलगी बसली आहे. थोड्या वेळात अजून एक मुलगी त्या मुलीच्या पायावर येऊन बसते. ती मुलगी उठण्यासाठी अतोनात प्रयत्न करते पण त्या दोघी तिच्या अंगावरुन उठत नाहीत. धक्कादायक म्हणजे तिथे उभी असलेली तिसरी मुलगी तिच्या डोक्याला पाय मारते. त्या मुलीचं डोक जमिनीवर आपटलं जातं. ती तिसरी मुलगी तिचे केस ओढते...त्या तिघी मुली त्या विद्यार्थींनीला शिवीगाळ करतानाही दिसतं आहे. इतर मुली या घटनेचा व्हिडीओ काढताना दिसतं आहेत.
कारण ऐकून बसेल धक्का!
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पीडीतेच्या वडिलांनी या घटनेची लेखी तक्रार दाखल केली आहे. पीडित मुलीने त्या तिघींना ड्रग्ज घेण्यास नकार दिल्याने तिला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तिन मुलींपैकी एक मुलगी बॉक्सर आहे. या मारहाणीत पीडित मुलीच्या चेहऱ्याला आणि मानेला जखम्या झाल्या आहेत. (Trending Video school girls abusing beating classmate for refusing to take drugs pakistan School Girls Fight Viral on Social media)
कुठली आहे घटना?
हा धक्कादायक प्रकार पाकिस्तानमधील लाहोर इथल्या उच्चभ्रू शाळेतील आहे. हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लेटफॉर्म ट्विटरवर पीटीआय सदस्य महीन फैसल यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओसोबत त्या म्हणाल्या आहेत की, ही एक अमेरिकन इंटरनॅशनल स्कूलचे दृश्यं आहेत. विद्यार्थीनीने मद्यपान करण्यास नकार दिल्यामुळे तिला मारहाण करण्यात आली.