Gril Viral Video : मधुर भांडारकर यांचा फॅशन (Fashion video) हा चित्रपट तुम्हाला आठवतो का? त्या मुंबईतील फॅशन जगातील अनेक घडामोडीवर हा चित्रपट होतात. एका मॉडेलच्या आयुष्यातील वादळ यात दाखविण्यात आले आहेत. रॅम्प वॉकवर मॉडेलसोबत (model) घडणाऱ्या अनेक गोष्टी यात पाहिला मिळतात. यात कंगनाचा रॅम्प वॉकवर ड्रेस फाटतो आणि मग तिचं जगासमोर तिचं...असाच प्रकार एका मॉडेलसोबत खऱ्या खुऱ्या आयुष्यातही घडला आहे. असो टीव्हीवर किंवा सोशल मीडियावर (Viral Video) फॅशन शोचे अनेक शो बघायला मिळता... अशा एका शोमध्ये मॉडेल्स रॅम्प वॉकवर कॅटवॉक करताना तिच्यासोबत जे घडलं ते पाहून उपस्थितासोबतच सगळ्यांचा हृदयाचे ठोके चुकले. 


आणि ती मॉडेल...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, 58 वर्षांची सुपरमॉडेल हाय हील्स सॅंडल घालून रॅम्प वॉकवर कॅटवॉक करताना दिसतं आहे. कॅटवॉक करायचा म्हणजे चित्रविचित्र फॅशन आणि हाय हील्स सँडल हे समीकरण...रॅम्प वॉक सुरु झाला आणि मग या सुपरमॉडेल हाय हील्स सँडलमुळे पडल्या...त्या परत उभ्या राहिल्या पण त्या परत खाली पडल्या...यामुळे उपस्थितीना एकच धक्का बसला...एक व्यक्ती त्यांचा मदतीला आला पण त्यानंतर या सुपरमॉडेलने जे केलं ते पाहून उपस्थितींसोबत सर्वांच्या भुवया उंचावल्या. (trending video supermodel Christine McMenemy high heels catwalk on the ramp walk due to Fell twice Video viral on social media )



त्या एका निर्णयाने वेधलं लक्ष


या सुपर मॉडेलने कसालाही विचार न करता सँडल काढून हातात घेतलं आणि पुन्हा एका आत्मविश्वासाने रॅम्प वॉकवर कॅटवॉक सुरु केला. त्या एका निर्णयामुळे फॅशन जगतात त्यांनी लक्ष वेधून घेतलं आहे.  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे जगभरात या सुपरमॉडेलची चर्चा होते आहे. 



या फॅशनमधील घटना


ही घटना पॅरिसमधील वॅलेंटिनोच्या स्प्रिंग 2023 च्या फॅशन शोदरम्यान घडली.  तर या सुपरमॉडल आहेत अमेरिकन क्रिस्टीन मॅक्मेनेमी. 1984 पासून त्यांनी फॅशन जगतात पाय ठेवला. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या व्हिडीओला ट्विटरवर 2.7 कोटीहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर 1.27 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. या मॉडेलचा आत्मविश्वास पाहून नेटकऱ्यांनी कौतुक केलं आहे.