मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होत असतात. यातील काही व्हिडिओ खुपच चांगले असतात, तर काही व्हिडीओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. सोशल मीडियावर Reddit या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.  हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे,.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हिडिओत काय? 
व्हायरल झालेल्य़ा व्हिडिओत (Video Viral) काही मुली (Girls dancing video) एकत्र मिळून नाचण्याचा आनंद घेत आहेत.या मुली एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून घोळका करून नाचत आहेत. असचं नाचता नाचता अचानक त्यांच्या वजनाने पायाखाली खड्डाच पडतोय. मुलींना क्षणभरही सावरण्याची संधी मिळत नाही आणि त्या आपल्या मैत्रिणींसोबत त्या गोल खड्ड्यात पडतात. यातील एक मुलगी जमीनवर राहते. ही तरूणी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते, मात्र तिला काही यश येत नाही. 



दरम्यान या पार्टीला आलेल्या इतर मुली ही घटना पाहून हादरतात. तसेच नंतर या तरूणींना वाचवण्यासाठी मदतीची याचना करताना पाहायला मिळत आहे. 


हा व्हिडिओ Reddit वर Humble Taylor अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ (Video Viral) पाहता आफ्रिकन देश वाटतो. मुलींनी उड्या मारल्याने तेथील गटाराचा कठडा फुटल्याचा दावा केला जात आहे. काही तासांतच या व्हिडिओला हजारो लाईक्स आले असून 700 हून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत.