Autorickshaw In UK City: भारतात घराबाहेर पडल्यानंतर प्रवासासाठी नागरीक सर्वाधिक ज्या पर्यायाचा वापर करतात, तो पर्याय म्हणजे रिक्षा (auto rickshaw) आहे. कारण प्रत्येक घराघराच्या चौकात या रिक्षा असतात. त्यामुळे या रिक्षातून प्रवास करणे त्यांना सोप्पे जाते. मात्र हीच रिक्षा आता ब्रिटनमध्ये (britain) पोहोचलीय.ब्रिटनच्या रस्त्यावर ही काळी पिवळी रिक्षा धावताना दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुम्ही भारतातील रस्त्यावर हजारो ऑटो रिक्षा (auto rickshaw) धावताना पाहिल्या असतील, तसेच त्यामधून प्रवास केला देखील असेल. मात्र तुम्ही ब्रिटनच्या रस्त्यावर रिक्षा धावताना पाहिली आहे का? नाही ना, तर आम्ही तुम्हाला दाखवतो, ब्रिटन सारख्या दुर देशातील रस्त्यावर रिक्षा धावताना दिसत आहे. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे. 


हे ही वाचा : भावा जिंकलस रे! बाप-लेकाचा VIDEO पाहुन तुमच्याही डोळ्यात येईल पाणी 


व्हिडिओत काय? 


परदेशात प्रवासासाठी मेट्रो आणि ट्रेन सारख्या खाजगी प्रवासी सेवा असतात. अथवा काही लोक त्यांच्या कारने देखील प्रवास करत असतात. त्यामुळे येथे भारतासारख्या प्रवासी सेवा नाहीयेत. मात्र प्रथमच ब्रिटनमध्ये (britain) भारताप्रमाणे रस्त्यांवर रिक्षा धावताना दिसून आली आहे. त्यामुळे ही रिक्षा पाहुन तेथील भारतीय देखील आश्चर्यचकीत झाले आहे. 


सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक चालक परदेशात ऑटो-रिक्षा (auto rickshaw) चालवताना दिसत आहे. त्याने इंग्लंडमधील यॉर्क शहरातील एका विद्यार्थ्याला त्याच्या काळ्या पिवळ्या तीन चाकी ऑटो रिक्षात बसवून फिरवले आहे. 


हे ही वाचा : पुरानी जीन्स! जगभरातील सर्वात जुनी जीन्स 94 लाखांना विकली, जाणून घ्या कारण


व्हिडिओमध्ये, ड्रायव्हर त्याच्या ऑटोरिक्षामध्ये (auto rickshaw) भारतीय गाणे वाजवून शहरभर गाडी चालवताना दिसत आहे.विशेष म्हणजे हा प्रवासी देखील मुंबईचा होता. त्यामुळे त्याला या प्रवासात भारतात असल्याचा भास झाला. हा व्हिडिओ एका ऑटो-रिक्षा चालकाने शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनला त्याने लिहले की, ''यॉर्क में आया, बॉम्बे से लौटकर'', म्हणजेच मुंबईमधून यॉर्कमध्ये आला. 


दरम्यान rickshawala.co.uk नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, "आज रिक्षात (auto rickshaw) फिरायला जाण्याचा चांगला दिवस... @kane___25603 ला भेटलो आणि त्याला मुंबईचा आनंद देण्यासाठी यॉर्कच्या सहलीला घेऊन गेलो, जे खूप छान होते, असे तो म्हणालाय. 



सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.