धावत रस्ता क्रास करताना अचानक समोरून आला ट्रक; VIDEO पाहून अंगावर येतो काटा
कधी दुसऱ्यांचा चुकीमुळे एखाद्याचा बळी जातो किंवा आपल्या निष्काळीपणामुळे आपण मृत्यूला निमंत्रण देतो.
Viral Video : रस्ते अपघाताचे अनेक धक्कादायक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. कधी दुसऱ्यांचा चुकीमुळे एखाद्याचा बळी जातो किंवा आपल्या निष्काळीपणामुळे आपण मृत्यूला निमंत्रण देतो. सोशल मीडियावर अनेक असे अपघाताचे व्हिडीओ पाहिला मिळतात जे पाहून अंगावर काटा येतो. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून पायाखालची जमीन सरकते.
थरकाप उडवणारा व्हिडीओ
3 सेकंदचा हा व्हिडीओ आपल्या हृदयाचे ठोके चुकवतो. तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता एक महिला धावत रस्ता ओलांडत असते. तेवढ्यात समोरून ट्रक येताना तिला दिसतो. ती थांबण्याचा प्रयत्न करते पण तिचा पाय घसरतो आणि तिचं डोकं ट्रकच्या चाकाखाली येते.
हुश्श! नशीब
हा सगळा 3 सेकंदचा खेळ. पण नशीब साथसोबत असेल तर आपण मृत्यूला चकवा देऊ शकतो. असंच काहीस या महिलेसोबत येवढ्या मोठ्या दुर्घटनेतही ही महिला सुखरुप वाचली आहे. कदाचित यमराज झोपण्यात व्यस्त असल्याने या महिलेचा जीव वाचला आहे. ट्रक चालकाने वेळीच ब्रेक मारल्यामुळे महिला थोडक्यात वाचली. विशेष म्हणजे या महिलेला साध खरचटलं देखील नाही.
हा व्हिडीओ Shocking Videos ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लकी महिला असं या व्हिडीओला कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ पाहून नेटिझन्सला घाम फुटला आहे. एका यूजरने म्हटलं आहे की, या महिलने आजच्या दिवशी बर्थडे साजरा केला पाहिजे कारण तिला नवं आयुष्य मिळालं आहे.
रस्तावरुन चालताना किंवा रस्ता क्रास करताना कुठल्याही निष्काळजीपणा करु नका, कारण प्रत्येक वेळी यमराज सुट्टीवर नसणार.