Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. तो पाहून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. सोशल मीडिया अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ अतिशय धक्कादायक आणि भीतीदायक असतात. असाच काहीसा प्रसंग या व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. 


कुत्र्याचा चिमुकल्यावर हल्ला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक कुटुंब आरामात घराबाहेर बसलं आहे. यात एक महिला आणि चार मुलं दिसत आहेत. त्यांचासोबत एक पाळीव कुत्रादेखील दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मुलं छान खेळ आहेत. तेवढ्यात एक मुलगा जरा दूर जायला लागला. आपल्यासोबत काय होऊ शकतं याची कल्पना नसतानाही हा मुलगा आपल्याच धुंदीत असताना अचानक रस्त्यावरील कुत्राने त्याचावर हल्ला केला. तो कुत्र्याने चिमुकल्याला रस्त्यावर खाली पाडले. हे दृष्य पाहून अंगावर शहारा येतो. पण त्याचवेळी पाळीव कुत्र्याने त्या रस्त्यावरील कुत्र्यावर हल्ला केला आणि त्या चिमुकल्याचा जीव वाचवतो. 


हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर व्हायरल होतो आहे.  हा व्हिडीओ meemlogy नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. नेटिजनला हा व्हिडीओ खूप आवडत आहे. व्हिडीओमधील हिरो ठरलेला पाळीव कुत्र्याचे सर्वजन खूप कौतुक करत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Meemlogy (@meemlogy)