स्ट्रेट ड्राईव्ह मारत लॉक उघडलं, मग पूल शॉट मारत... क्रिकेट स्टाईलमध्ये बाईक चोरी, Video
Viral Video : सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक चोर क्रिकेट स्टाईलमध्ये मोटरसायकल चोरी करताना दिसत आहे. चोरीचा त्याचा हा अंदाज पाहून युजर्सने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
Trending Video : आतापर्यंत चोरीचे अनेक प्रकार तुम्ही पाहिले असतील. चोर अगदी शिताफीने चोरी करत लाखोंचा ऐवज लंपास करतात. सीसीटीव्हीच्या (CCTV) भीतीने चोर चेहऱ्यावर मास्क लावून चोरी करताना दिसतात. दुकानात, बंगल्यात, कारची चोरी झाल्याच्या अनेक बातम्या आपण ऐकतो. पण सध्या सोशल मीडियावर एका चोराचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. चोराच्या चोरी करणाच्या अनोख्या स्टाईलमुळे हा व्हिडिओत प्रचंड व्हायरल झाला आहे. एक चोर रस्त्याच्या कडेला असलेल्या बाईकची क्रिकेटस्टाईलमध्ये चोरी (Cricket Style Theft) करताना दिसतोय.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक दुचारी रस्त्याच्या कडेला उभी असलेली दिसतेय. काही वेळात शॉट आणि टी शर्ट घातलेला एक तरुण येताना दिसतोय. या तरुणाच्या हातात क्रिकेटची बॅट आहे. हवेत क्रिकेटचे काही शॉट्स खेळत तो बाईकजवळ पोहोचतो. सुरुवातीला हा तरुण कुठेतरी क्रिकेट खेळायला चालला आहे, असं व्हिडिओ पाहून वाटेल. आजूबाजूला पाहून अगदी दिवसा ढवळ्या या तरुणाची बाईक चोरीची स्टाईल थक्क करणारी आहे.
आधी आसपासचा अंदाज घेत हा तरुन स्ट्रेट ड्राईव्हचा फटका मारल्याची स्टाईल करत अगदी शिताफीने बाईकचं लॉक उघडतो. त्यानंतर पुल शॉट मारण्याची स्टाईल करत तो बाईकवर बसत बाईक मागे घेण्याचा प्रयत्न करतो. याचवेळी एक व्यक्ती तरुणाच्या बाजून जाताना दिसतोय. पण त्याला हा तरुण चोरी करत करण्याच्या उद्देशाने इथे आल्याचा जराही अंदाज आलेला दिसत नाही.
सीसीटीव्ही पाहिला आणि...
बाईकवर बसल्यानंतर हा तरुण रस्ता साफ असल्याचा अंदाज घेतो. त्यानंतर धक्का मारत तो बाईक मागे घेतो. बाईक सुरु करण्यासाठी तो आपल्या खिशातून मास्टर कि काढताना दिसतोय. पण तितक्यात त्याची नजर समोर लागलेल्या सीसीटीव्हीवर जाते आणि या तरुणाची पाचावर धारण बसते. आपले सर्व कारनामे सीसीटीव्हीत कैद झाल्याचं त्याला कळताच. बाईक तिथेच टाकून तो बाईकवरुन उतरतो. त्यानंतर सीसीटीव्हीत दिसू नये साठी तो बॅटने आपलं तोंड झाकत सीसीटीव्हीच्या समोरून रफूचक्कर होतो.
व्हिडिओ ठरवून बनवलेला?
हा व्हिडिओ @swatic12 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1.9 मिलिअन लोकांनी पाहिला आहे. अनेक युजर्सने या व्हिडिओला लाईक केला असून अनेकांनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने म्हटलंय हा व्हिडिओ ठरवून बनवलेला आहे. स्मार्टफोनला सीसीटीव्ही सारखा अँगल देण्यात आलेला आहे. कारण कॅमेरा हलल्याने त्यांच्या प्लानचा फियास्को झाल्याचं युजरने म्हटलंय.