Devar Bhabhi Viral Dance: सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल (viral video) होत असतात. काही व्हिडिओ हे खुप मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ खुपच धक्कादायक असतात. असाच एक मनोरंजन करणारा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ लग्नातील डान्सचा आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर (Social Media) चर्चा रंगली आहे. नेमकं या व्हिडिओत काय आहे, ते जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभरात लग्नाचा माहोल सुरू आहे. जागोजागी लग्नातील ढोल-नगाडे वाजतायत. सोशल मीडियावर देखील लग्नाचा फिव्हर दिसून येत आहे. कारण सोशल मीडिय़ावर लग्नातील डान्सचे व्हिडिओ व्हायरल (viral video) होत आहे. काही व्हिडिओ नातेवाईकांचे आहेत, तर काही व्हिडिओ नवरीच्या डान्सचे आहेत. असाच एक नवरीच्या डान्सचा व्हिडिओ (Bride Dance video) समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 


व्हिडिओत काय? 


व्हायरल झालेल्या या व्हिडिओत नवरी नवऱ्याचा हात धरून प्रथम डान्स फ्लोअरवर येते. यावेळी ती नवऱ्यासोबत नाचणार असते, तेव्हाच एक तरूण येतो आणि ती त्याच्यासोबत नाचायला सुरूवात करते. आणि नवऱ्याला मागे उभारून त्यांचा डान्स पाहावा लागतो. पुढे दोघेही भन्नाट डान्स करतात.
या व्हिडिओत नवरी 'हम साथ साथ हैं' चित्रपटातील 'छोटे छोटे भैया के बडे भैया' गाण्यावर अप्रतिम डान्स करताना दिसत आहे.



दरम्यान couple_official_page नावाच्या Instagram अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत दोन हजारांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर (viral video) लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.