Viral Video : सोशल मीडिया (Social Media) असं ठिकाण आहे जेथे अनेक व्हिजडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ बघता बघता लाखो लोकांपर्यंत पोहोचतात. व्हायरल व्हिडिओ हे सर्वाधिक प्राण्यांबाबत असतात. सध्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये एका मुलीला माकडाची छेड काढणं चांगलंच महागात पडलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माकडं (Monkey) ही माणसांना नेहमीच हैराण करण्याचं काम करतात. अनेक ठिकाणी आपण पाहिलंय की माकडं पर्यटकांना कसे त्रास देतात. त्यामुळे पर्यटक त्यांच्यापासून अंतर ठेवतात. पण काही जण असतात. ज्यांना प्राण्यांची छेड काढण्यात मज्जा वाटते. पण असं करताना त्यांना कधी-कधी ते महागात पडतं.


सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ (Viral Video) एका प्राणीसंग्रहालयातील आहे. काही लोकं येथे पिंजऱ्यात असलेल्या माकडांना त्रास देताना दिसत आहेत. एक तरुणी पिंजऱ्यात असलेल्या माकडांना छेडण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर माकडं या तरुणीची केस धरतात.



माकड बराच वेळ केस पकडून ओढत असतात. माकडं चांगलेच आक्रमक झालेले पाहून कोणाचीही पुढे जाण्याची हिंमत होत नाही. पहिल्यांदा ही तरुणी कशी तरी सूटते. पण पुढे जाताना पुन्हा माकडं या तरुणीचे केस धरतात.