सोशल मीडियावर (Social Media) अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हिडिओत काही व्हिडिओ तुमचे खुप मनोरंजन करतात, तर काही व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्काच बसत असतो. असाच एक धक्का देणारा एक व्हिडिओ (Viral video) समोर आला आहे. या व्हिडिओत एक भला मोठा किंग कोब्रा (Kind Cobra) साप किचनमध्ये घुसल्याची घटना घडलीय. हा किंग कोब्रा घरातून कसा रेस्क्यू करण्यात येतो हे या बातमीतून जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आश्चर्यकारक! उन्हात जाताच महिलेच्या कपड्याचा रंग बदलला, Video पाहुन तुम्हालाच धक्का बसेल


व्हिडिओत काय?


व्हिडिओत तुम्ही पाहू शकता, एका घरातील किचनमध्ये हा सर्वांत विषारी साप किंग कोब्रा (Kind Cobra) घुसला आहे. या सापाची लांबी खुपच जास्त आहे. हे व्हिडिओतून स्पष्ट दिसत आहे. तसेच हा साप स्वत:ला वाचवण्यासाठी किचनच्या आत आणखीण घुसण्याचा प्रयत्न करत आहे.मात्र रेस्क्यु टीमच्या एका व्यक्तीने त्याची शेपूट पकडली असल्या कारणाने त्याला पळता येत नाही. मात्र तरीही तो स्वत:ला वाचवताना दिसत आहेत. 


व्हिडिओत एक वेळ अशी देखील येते,ज्यावेळेस रेस्क्यू टीम किंग कोब्राला पकडत असताना तो अचानक त्या रेस्क्यू करणाऱ्या व्यक्तीच्या समोरच फना काढून बसतो. किंग कोब्रा (Kind Cobra) त्या व्यक्तीला दंश करेल असे एकावेळेस वाटते, मात्र सुदैवाने तसे होत नाही. त्यामुळे हा व्हिडिओ (Viral video) पाहुन नेटकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. 


नेमकी घटना कुठे घडली?  


थायलंडमधील एका घरात ही घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास हा किंग कोब्रा (Kind Cobra) घरातील किचनमध्ये शिरला होता. या घटनेचा माहिती मिळताच घरातील कुटूंबियांना मोठा हादरा बसला होता. या घटनेची माहिती कुटूंबियांनी रेस्क्यू टीमला (Rescue Team) दिली होती. 


रेस्क्यू टीम (Rescue Team) घटनास्थळी पोहोचताच त्यांनी किंग कोब्राला (Kind Cobra) रेस्क्यू करायला सुरूवात केली. किंग कोब्राची लांबी पाहुन संपुर्ण टीमला त्याला रेस्क्यू करायला लागले होते. यावेळी रेस्क्यू टीमने (Rescue Team) मोठ्या शिथाफीने कोब्राला किचनमधून बाहेर काढलं होत. मात्र त्याला पेटीत बंद करण्यात येत नव्हत.त्यामुळे त्याला मग घराबाहेर नेण्यात आले. घराबाहेर मोठा परिसर असल्याने त्याला रेस्क्यू करता आलं. 


किंग कोब्रा (Kind Cobra) फणा काढून बसला होता. यानंतर सर्पमित्रांनी आपलं कौशल्य पणाला लावत त्यांना धरलं. मग एकाने किंग कोब्रासाठी आणलेला कंटेनर उघडला आणि त्यात त्याला बंद करण्यात आले.दरम्यान त्याला आता नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. 



NowThis नावाच्या ट्वीटर अकाऊंटवर या घटनेचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. नाऊधिसच्या माहितीनुसार थायलंडमधील ही घटना आहे.सर्पमित्रांनी मोठ्या शिताफिन या किंग कोब्राचं (Kind Cobra) रेस्क्यू केले होते. या संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनचा (Rescue Team) व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.