लाकडाच्या फर्निचरवर आहेत डाग किंवा बसली आहे धूळ? तर `या` टिप्स वापरून आजच करा साफ
Tricks Cleaning Wooden Furniture: तुमची मुलं सतत खेळतात तुमच्या लाकडाच्या सोफ्यावर किंवा मग लाकडाच्या फर्निचरवर... त्यानं सतत फर्निचर खराब होत असेल तर कसं साफ होणार ही समस्या असेल तर आजच वाचा ही बातमी नक्कीच होईल तुम्हाला फायदा...
Tricks Cleaning Wooden Furniture: उन्हाळ्यात ऊन , धूळ, मातीने भरलेले वारे आपल्याला त्रास देतात. ज्याचा आपल्या श्वासावर तर परिणाम होतोच पण हे वारे घरात घुसल्यामुळे घराच्या कानाकोपऱ्यात धूळ कचरा साचतो. अशावेळी घरातील महागडे लाकडी फर्निचर याने खराब होतात. तर ते स्वच्छ करण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यासाठी काही DIY सोल्यूशन्स तयार करून लाकडी फर्निचरचे संरक्षण आणि स्वच्छता कसे करावे ते जाणून घेऊया...
घरातील लाकडी फर्निचर स्वच्छ करण्यासाठी या पद्धतींचा अवलंब करा
एक स्प्रे बाटली घ्या आणि त्यात फॅब्रिक सॉफ्टनरचे दोन थेंब घाला.आता त्यात दोन कप पाणी आणि एक कप व्हिनेगर घाला. या स्प्रेच्या मदतीने तुम्ही घरातील सर्व खिडक्या आणि फर्निचर साफ करू शकता.
एक स्प्रे बाटली घ्या आणि त्यात दोन कप पाणी आणि एक कप व्हिनेगर घाला. यामुळे फर्निचरचे निर्जंतुकीकरण होईल आणि जंतू दूर होतील. आता त्यात दोन चमचे ऑलिव्ह ऑईल टाका. हे फर्निचरवर पॉलिशचे काम करेल. तुम्ही त्यात डिशवॉशर लिक्विड सोपचे दोन थेंब देखील घालू शकता. आता तुमचा लाकडाचं फर्निचर स्वच्छ करण्याचा स्प्रे तयार झाला आहे. त्याच्या मदतीने, फर्निचरची पृष्ठभाग स्वच्छ आणि पॉलिश करा.
हेही वाचा : नवीन कपडे वापरायला काढण्याआधी धुवून का घालावेत?
एक स्प्रे बाटली घ्या. त्यात एक कप पाणी घालून 2 ते 3 चमचे खोबरेल तेल घाला.तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात चंदनाच्या तेलाचा एक थेंबही टाकू शकता. या स्प्रेच्या सहाय्याने प्रथम फर्निचरची धूळ करा आणि नंतर त्यावर फवारणी करा आणि मायक्रोफायबर कापडाने पुसून टाका.
लाकडाचं फर्निचर साफ करण्यासाठी तुम्ही लिंबूचा रस देखील वापरू शकतात. यासाठी लिंबूचा रस घ्या. त्याला एका कपड्याच्या कोपऱ्याचा भाग या लिंबाच्या रसात भिजवा आणि त्यानंतर लाकडाचं फर्निचर साफ करा. ही पद्धत वापरल्यास काही क्षणातच तुमच्या घरातील फर्निचर साफ होईल.
या व्यतिरिक्त तुम्ही लाकडाचं फर्निचर साफ करण्यासाठी किंवा त्यावर असलेले चहा आणि कॉफीचे डाग काढण्यासाठी वॅक्स जॅम किंवा मग काळेपणा घालवण्यासाठी स्टील स्क्रबरचा वापर करू शकता. स्टीलच्या स्क्रबरनं तुमच फर्निचर नक्कीच साफ होईल त्यानंतर एका मऊ कपड्यानं त्याला साफ करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)