Trending Video : खरं प्रेम काय असतं, याचा उत्तर प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. प्रेमाची भावना अतिशय सुंदर आणि जग जिंकणारी असते. आपल्या प्रेमाला जेव्हा घरच्यांची साथ मिळते तेव्हा तर त्यांचा आनंदाला पारा उतर नाही. सोशल मीडियावर एका जोडप्याचा प्रेम कहाणीसोबत त्यांचा संघर्षाची कहाणी चर्चेली जातेय. सिरजना सुबेदी आणि बिबेक पंगेनी या दोघांची कहाणी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतंय. (true love Sad Story of Srijana and Bibek Subedi fourth stage brain cancer emotional journey video viral on Internet trending reels)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर सिरजना सुबेदी आणि बिबेक पंगेनी लग्न केलं. बिबेक हा सिरजनाचा शाळेतील सिनियर होता. संसाराची सुंदर स्वप्न उराशी बाळगतसुबेदी आणि बिबेक हे घेते US मध्ये PhD करण्यासाठी शिफ्ट झाले. रोज नवीन क्षण ते एकमेकांसोबत घालवत होते. दिवसे हळूहळू पुढे जाते होते. 



एक दिवस अचानक बिबेकच्या डोक्यात कळा येऊ लागल्या. ते दोघे चेकअप करण्यासाठी हॉस्पिटलला गेले. त्यावेळी बिबेक सुबेदीला म्हणाला होता, ''मला काही नाही होणार, तू काळजी नको करु.'' हॉस्पिटलमध्ये अनेक टेस्ट करण्यात आल्या. दुदैवाने MRI च्या रिपोर्टनंतर त्यांचा आयुष्यात भूकंप आला. 



बिबेकला चौथ्या टप्प्यातील मेंदूचा कर्करोग झाल्याचं निदान झालं. यानंतर बिबेकाला जगविण्यासाठी तिचा संघर्ष सुरु झाला. त्याला आनंद देण्यासाठी ती प्रत्येक गोष्ट करत होती. 



या निदानानंतर त्यावर दोन मेजर शस्त्रक्रिया पण करण्यात आल्या. रोज नवीन आव्हान आणि भावनाची वेदना...कधी त्याची तब्येत खलवायची तर कधी तो खूप उदास व्हायचा. त्याच्या या संकटात आणि लढाई सुबेदी खंबीर उभी होती. यमराजाशी तिची लढाई सुरु होती. ती यमराज आणि तिच्या नवऱ्याचामध्ये एका भीती सारखी उभी होती. 



ती चोवीस तास फक्त त्याचासोबत होती, त्याला जेवण भरवण्यापासून पुस्तक वाचण्यापर्यंत अगदी सगळ्या गोष्टी ती प्रेमाने करत होती. पण ज्या क्षणी त्याच्या डोक्यावरील केस काढण्याची वेळ आली तेव्हा मात्र ती पुन्हा हादरली. पण ती परत नव्याने उभी राहील आणि त्याला साथ देण्यासाठी तिने स्वत:चे केस कापून टाकले. 



तिला जे काही शक्य होतं ते सर्व ती करत होती. तिच्या या संघर्षाची आणि जिद्दी कहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. इन्स्टाग्रामवरील officialpeopleofindiaandcrzana_subedi या अकाऊंटवर ते व्हिडीओ पाहिला मिळतात. यातील त्यांचा भेटण्यापासून कॅन्सरचं निदान झाल्यानंतरचे प्रत्येक क्षण दाखविण्यात आले आहे. जे पाहून आपल्या डोळ्यातून अश्रू थांबत नाही. हे व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हेच म्हणतोय खरं प्रेम काय असतं तेच दिसून येतं आहे.