वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगातील सर्वात शक्तीशाली व्यक्ती म्हणून ओळखले जात आहेत. परंतु, ते देखील कर्जबाजारी आहेत... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे कर्ज काही डॉलर्सचं नाही तर तब्बल ३१.५६ करोड डॉलर्सचं (२० अब्ज रुपयांचं) आहे. अमेरिकेच्या संघिय आर्थिक अहवालानुसार ट्रम्प यांच्यावर २०१७ च्या मध्य काळातील आहे.


उल्लेखनीय म्हणजे, यशस्वी व्यापारी ते राष्ट्रपती असा प्रवास करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना नव्या वॉशिंग्टन हॉटेलमधून दोन करोड डॉलरहून अधिक नफा झालाय. याशिवाय विंटर व्हाईट हाऊसच्या नावानं प्रसिद्ध असलेल्या फ्लोरिडा स्थित मार-ए-लागो रेस्टॉरन्टच्या नफ्यातही वाढ झालीय.


२०१६-२०१७ या काळात ट्रम्प यांचं उत्पन्न जवळपास ५९.४ करोड डॉलर होतं.