भारतीय-अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्यासाठी ट्रम्प यांनी घेतला मोदींचा सहारा
निवडणूक जाहिरातीसाठी ट्रम्प यांचा पहिला व्हिडिओ आला समोर
वॉशिंग्टन : अमेरिकेतील जवळपास २० लाख भारतीय-अमेरिकन मतदारांना आकर्षित करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचार मोहिमेच्या व्यवस्थापकांनी त्यांची पहिली जाहिरात व्हिडिओच्या रूपात जाहीर केली आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (नरेंद्र मोदी) यांच्या भाषणांची संक्षिप्त क्लिप्स आणि ट्रम्प यांचा अहमदाबादला असलेला ऐतिहासिक दौरा देखील दाखवण्यात आला आहे.
यावर्षी फेब्रुवारीमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर आले होते. मोदी आणि ट्रम्प यांनी अहमदाबादमध्ये एका मोठ्या स्टेडिअमध्ये भाषण देखील केले होते. ट्रम्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड कुशनर आणि त्यांचे काही उच्च अधिकारीही उपस्थित होते.
ट्रम्प विक्ट्री फायनान्स कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष किम्बर्ली गुइलफॉयल यांनी ट्विट करत व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं की, 'अमेरिकेचे भारतासोबत चांगले संबंध आहेत आणि आमच्या मोहिमेला भारतीय-अमेरिकन लोकांचा मोठा पाठिंबा आहे!' या मोहिमेचे नेतृत्व करणारे राष्ट्राध्यक्षांचा मुलगा डोनाल्ड ट्रम्प जूनियर हे भारतीय-अमेरिकन समुदायाशी चांगलेच जुळले आहेत. ही जाहिरात लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली.'
फोर मोर ईयर्स नावाचा 107 सेकंदाचा हा व्हिडिओ आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्या फुटेज सोबत हा व्हिडिओ सुरु होतो. दोघेही मागील वर्षी पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौर्याच्या वेळी ह्युस्टनच्या एनआरजी स्टेडियममध्ये हसत-हसत जात होते. त्यानंतर जगातील दोन सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशांच्या नेत्यांनी 50,000 हून अधिक भारतीयांना संबोधित केले होते.
अमेरिकेत हजारो समर्थकांमध्ये पीएम मोदी यांनी त्यांच्या भाषणात ट्रम्प यांचे खूप कौतुक केले होते. मोदी भारतीय-अमेरिकन लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ह्युस्टनमध्ये झालेल्या मोदींचा 'हाऊडी मोदी' या कार्यक्रमात देखील 50,000 लोकं आले होते.