ट्रम्प यांचा बेजबाबदारपणा, बिना मास्क पोहोचले फॅक्ट्रीच्या दौऱ्यावर
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी मंगळवारी अॅरिझोनाच्या मास्क फॅक्टरीचा दौरा केला. पण फॅक्टरीचा
अॅरिझोना : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी मंगळवारी अॅरिझोनाच्या मास्क फॅक्टरीचा दौरा केला. पण फॅक्टरीचा दौरा करताना त्यांनी फेस मास्क लावलेला नव्हता. ट्रम्प हे अनेक महिन्यानंतर वॉशिंग्टनच्या बाहेर आले आहेत, त्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी मास्क बनवणाऱ्या फॅक्टरीचा दौरा केला आहे.
या फॅक्टरीत हे देखील लिहिलं होतं की, फेस मास्क वापरणे आवश्यक आहे, या क्षेत्रात फेस मास्क लावणं आवश्यक आहे, धन्यवाद, असं लिहिलं होतं.
एवढंच नाही, त्यांच्यासोबत हनीवेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेरियस अडमजीक, व्हाईट हाऊसचे चीफ ऑफ स्टाफ मार्क मीडोज आणि काही महत्त्वाचे व्यक्ती होते, त्यांनी देखील मास्क लावलेला नव्हता.
सरकारने एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला अमेरिकेत COVID-19 चे कोणतेही लक्षण नसतानाही मास्क वापरण्याची सूचना केली होती, ज्यामुळे व्हायरसचं संक्रमण थांबवता येईल. तसेच आतापर्यंत ट्रम्प यांनी आपला चेहरा झाकण्यास म्हणजेच मास्कमध्ये झाकला जाणारा चेहरा ही त्यांची नापसंती राहिली असल्याचं सांगतात.
उपराष्ट्रपती माईक पेंस यांनी रविवारी मेयो क्लिनिकमध्ये चुकून मास्क घातला नव्हता, तर त्यांच्यावर खूप टीका झाली होती.