वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षा सल्लागारांनी सामूहिक राजीनामा दिला आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षेच्या प्रकरणात चालढकल केल्याचा आरोप करत सल्लागारांनी हा राजीमाना दिला आहे. राजीनामा दिलेल्या सल्लागारांमध्ये भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाचाही समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फॉर्च्यूनने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प यांच्या सात सदस्यांनी राजीनामा दिला आहे. या सदस्यांनी दिलेल्या सामूहिक राजीनामा पत्रात राष्ट्रीय सल्लागार परिषदेच्या (एनआयएसी) सायबर सुरक्षेबाबत प्रशासनाने दूर्लक्ष केले. याबाबत चिंता व्यक्त करत या सल्लागारांनी हा राजीनामा दिला आहे.  सल्लागारांनी म्हटले आहे की, सायबर सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर सरकार आणि प्रशासनाचे गांभीर्याने लक्ष नाही.


दरम्यन, या सर्व सल्लागारांनी त्रैमासिक बैठकीच्या काही काळ आगोदर हे राजीनामे दिले. राजीनामा दिलेल्या सल्लागारांमध्ये व्हाईट हाऊसचे प्रमुख डाटा वैज्ञानिक डी जे पाटील, क्रिशटिन डोरगेलो आदी मंडळी ओबामांच्या काळापासून कार्यरत आहेत.