मुंबई : सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानी महिला पत्रकाराचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लाईव्ह कार्यक्रमाचं अँकरिंग करताना या महिला पत्रकाराचा मृत्यू झाल्याचा संदेश या व्हिडिओसोबत फिरतोय. एका पाकिस्तानी न्यूज चॅनलसाठी ही महिला लाईव्ह अँकरिंग करताना या व्हिडिओत दिसतेय. 




हा व्हिडिओ जरी खरा असला तरी या महिला पत्रकाराच्या मृत्यूची बातमी केवळ अफवा असल्याचं समोर येतंय. या महिला पत्रकाराचं नाव आहे इरजा खान... हा व्हिडिओ २०१६ साली इरजा जेव्हा इमरान खान यांची एक रॅलीचं रिपोर्टिंग करत होती त्यावेळचा आहे... 


रिपोर्टिंग करताना भोवळ येऊन इरजा क्रेनवरून खाली कोसळली होती. त्यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं... त्यानंतर तिची प्रकृती सुधारली आणि ती पुन्हा जोमानं कामालाही लागली.

आपला हा व्हिडिओ आणि आपल्या मृत्यूची बातमी पाहून इरजालाही धक्का बसलाय. 'मला आत्ताच माहीत पडलंय की मी एका वर्षापूर्वीच मृत्यूमूखी पडलेय... पण, मग तुम्ही ज्या मुलीला दररोज टीव्हीवर पाहताय ती कोण आहे' असं ट्विट इरजानं केलंय. त्यानंतर आपल्या नातेवाईकांना आणि शुभेच्छुकांनाही तिनं या अफवेवर विश्वास न ठेवण्याचा संदेश दिलाय.