Turkey Earthquake: `मला वाचवा हवं तर मी...`; ढिगाऱ्याखाली अडकलेल्या चिमुकलीची हृदय पिळवटून टाकणारी विनंती
Turkey and Syria earthquake please save my life i will become your slave: सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओमध्ये दोन्ही मुली ढिगाऱ्याखाली अडकल्याचं दिसत आहे.
Turkey And Syria Earthquake Please Save My Life I Will Become Your Slave: तुर्की आणि सीरियाच्या (Turkey And Syria Earthquake) सीमेवर झालेल्या भीषण भूकंपामध्ये हजारो लोकांनी प्राण गमावला आहे. या भूकंपामध्ये 8000 हून अधिक जणांनी प्राण गमावला आहे. या भूकंपामुळे 5500 इमारतींची पडझड झाली असून शेकडो लोक या पडलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. तुर्कीचे उपराष्ट्रपती नजह अल-अत्तर यांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे. पडलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली लोकांचा शोध घेतला जात आहे. याच दरम्यान एका ठिकाणी बचाव पथकातील लोकांना पडलेल्या इमारतीच्या ढीगाऱ्यासाठी दोन लहान मुली अडकल्याचं आढळून आलं. अडलेल्या मुलींबरोबर बचाव पथकातील लोकांनी साधलेल्या संवादादरम्यान या मुलांनी प्राण वाचवण्यासाठी केलेली विनंती ऐकून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.
या व्हिडीओमधील चिमुकली प्राण वाचवण्याची मागणी बचाव पथकाकडे करत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये इमातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेली मुलगी, "प्लीज मला वाचवा. मला बाहेर काढा. मी तुमचा गुलाम बनून राहील," असं सांगत आहे. हा व्हिडीओ सीरियामधील असल्याचा दावाही केला जात आहे. सोशल मीडियावर असे अनेक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाले आहे.
या दोन्ही मुलींचे प्राण वाचले असले तरी त्यांच्या पालकांचा मृत्यू झाल्याची माहिती या व्हायरल ट्वीटखाली देण्यात आली आहे.
सीरियामधील परिस्थितीही चिंताजनक असून या देशामध्ये मृतांची संख्या 1600 पुढे गेली आहे. अनेक ठिकाणी इमारतींच्या ढिगाऱ्यांखाली मृतांचा शोध घेतला जात आहे. भूकंपाचे अनेक आफ्टर शॉक बसले असून दुसऱ्या दिवशीही 6 रिश्टर स्केअलहून अधिकचा धक्का बसला आहे.
तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी आलेल्या 7.8 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपानंतर आलेल्या आफ्टर शॉकमध्येही अनेक इमारती पडल्या आहेत. या भूकंपामधील जखमींची संख्या 20 हजारांहून अधिक आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांनी या दोन्ही देशांमध्ये मदतकार्यासाठी टीम पाठवल्या आहेत. अनेक देशांनी मेडिकल टीमबरोबरच एनडीआरफच्या टीम आणि मदतीचं साहित्य पाठवलं आहे. भारतानेही सीरियाला मदत पाठवली आहे.