Turkey earthquake: सोमवारी तुर्कस्तानात भूंकपाचे (Turkey earthquake) तीव्र झटके बसले आणि तुर्कस्तान (Turkey) अक्षरश: हादरून गेलं आहे. आतापर्यंत 20 हजारांहून जास्त मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक जण अजूनही ढिगाऱ्याखाली दबले गेले आहेत. बचावकार्य सुरु आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुर्कस्तान हे भूकंप प्रवण क्षेत्र आहे. मात्र, 6 फेब्रुवारी रोजी बसलेले भूकंपाचे धक्के हे संपूर्ण दशकात झालेले सर्वात शक्तिशाली भूकंप होते. 6 फेब्रुवारी रोजी तुर्कस्तानात निसर्गाचं रौद्र रूप पाहायला मिळालं. दोन शक्तिशाली भूकंपाच्या धक्क्यांमुळे तुर्कस्तान-सीरिया सीमेजवळ पृथ्वीच्या कवचातील दोन प्रचंड विवर उघडले आहेत.


यूके सेंटर फॉर द ऑब्झर्व्हेशन अँड मॉडेलिंग ऑफ अर्थक्वेक्स, ज्वालामुखी आणि टेक्टोनिक्स (COMET) ही संस्था पृथ्वीच्या भूगर्भाचा अभ्यास करते. या संस्थेतील संशोधकांनी पृथ्वी-निरीक्षण युरोपियन उपग्रह सेंटिनेल-1 ने काही प्रतिमांचा अभ्यास केला. विनाशकारी भूकंपाच्या आधी आणि नंतर घेतलेल्या प्रतिमांचा अभ्यास करण्यात आला. भूमध्य समुद्राच्या किनार्‍याजवळील क्षेत्राच्या प्रतिमांची तुलना करण्यात आली.



300 किलोमीटर पर्यंत पडल्या भेगा


भूमध्य समुद्राच्या ईशान्य टोकापासून ईशान्य दिशेला साधारण 190 मैल (300 किलोमीटर) पर्यंत भेग गेल्याचे निदर्शनास आले आहे. 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या 7.8-रिश्टर स्केलच्या प्रचंड शक्तिशाली भूकंपामुळे तयार झालेली ही भेग असू शकते. तर दुसरी भेग साधारण 80 मैल (125 किमी) पसरली आहे. 7.5-रिश्टर तीव्रतेचा भूकंपाचा दुसऱ्या धक्क्यानंतर ही भेग पडली असू शकते असे COMET ने 10 फेब्रुवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


तुर्कस्तानातील विनाशकारी भूकंपात संपूर्ण शहर जमिनदोस्त झाले. टोलेजंग इमारती भूईसपाट झाल्या. अनेक जण बेघर झाले आहेत. भूकंपाने अनेकांच्या मृत्यूचा घास घेतला. या भूकंपाची काही ड्रोन दृश्यही समोर आली आहेत. 



सायप्रसच्या उत्तरेकडील भाग शक्तिशाली भूकंप प्रवणक्षेत्र आहे. कारण या भागात तीन टेक्टोनिक प्लेट्स अॅनाटोलियन, अरेबियन आणि आफ्रिकन प्लेट्स एकत्र येतात आणि एकमेकांवर आदळल्यामुळे दबाव निर्माण होतो. 


सरकारी संस्था तसेच खाजगी कंपन्यांद्वारे संचालित उपग्रह भूकंपमुळे झालेल्या नुकसानीचा अभ्यास करत आहेत. NASA च्या माहितीनुसार भूकंप पृष्ठभागाच्या खाली 11 मैल (18 किमी) फॉल्ट लाइनसह उद्रेक झाले. भूकंपाच्या केंद्रापासून शेकडो मैल दूरपर्यंत भूकंपाचे धक्के बसले. असे नासाने निवेदनात म्हटले आहे.