Turkey Earthquake: तुर्कीमध्ये (Turkey earthquake) पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के बसले आहेत. गेल्या 24 तासांतील हा तिसरा भूकंप आहे. दुसऱ्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.6 इतकी मोजण्यात आली होती. त्यानंतर आता तिसरा भुकंप (Third Consecutive Earthquake) 6 रिश्टर स्केलवर मोजण्यात आलाय. कहरामनमारा प्रांतातील (Kahramanmaras Earthquake) एल्बिस्तान जिल्ह्यात हे धक्के बसल्याने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका तासापूर्वी 6.0 तीव्रतेचा आणखी एक भूकंप मध्य तुर्कीला धडकला. USGS च्या म्हणण्यानुसार 24 तासांपेक्षा कमी कालावधीत दोन शक्तिशाली भूकंपानंतर (Powerful Earthquake Hit in turkey) तुर्कस्तानमधील हा तिसरा भूकंप आहे. त्यामुळे आता तुर्कीवर मोठा संकट कोसळल्याचं पहायला मिळतंय. (Turkey Earthquake third consecutive earthquake shook Turkey the kills over 1500 peoples 6 magnitude earthquake world news)


 



तिन्ही भूकंपाचा हादरा इतका जबरदस्त होता की, अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे खाली कोसळल्या. अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असल्यानं मृतांचा (Turkey Earthquake Death) आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लेबनॉन (Lebanon), सीरिया (Syria) आणि सायप्रसमध्ये (Cyprus) भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.


आणखी वाचा - Earthquake In Turkey LIVE: तुर्कीला भूकंपाचा दुसरा धक्का! 1300 हून अधिक ठार


दरम्यान, भूकंपाबाबत 3 दिवस आधीच एका संशोधकानं इशारा दिला होता.  संशोधक फ्रँक हूगरबीट्स यांनी 3 फेब्रुवारी रोजी या भूकंपाच्या धक्क्याविषयी कल्पना दिली होती. त्यामुळे आता नेमकी चूक कोणाची? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.