Turkey Syria Earthquake Latest News: तुर्की (Turkey) आणि सीरियात (Syria) आलेल्या भूकंपामुळे (Earthquake) नागरिकांचे अनेक कुटुंब उध्वस्त झालंय. आत्तापर्यंत 38 हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, मोठ्या संख्येत लोक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अशातच मदत आणि बचावकार्य सुरू असताना एक आश्चर्याचा धक्का देणारी बातमी समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुर्कीमधील भूकंपानंतर (Turkey-Syria Earthquake) सुमारे 203 तासांनी एक चमत्कार घडला. तुर्कीचे नागरिक लोकांना वाचवण्यासाठी काम करत आहेत. जखमी लोकांवर उपचार करणे, लोकांना अन्न पुरवणे आणि ढिगारा बाजूला करणं, अशी कामं सुरू असताना एक महिला ढिगाऱ्यात जिवंत सापडली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तिला सुरक्षित बाहेर काढलं.


महिला जिवंत बाहेर आल्यानंतर सर्वांनी टाळ्या वाजवत तिचं स्वागत केलं. तर पुढील उपचारासाठी दिली रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे. भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन भारताने सर्वोतपरी मदत देण्याची घोषणा केली आहे. एनडीआरएफच्या (NDRF) दोन टीम तुर्की आणि सिरियामध्ये दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर प्रशिक्षित डॉक्टर्स आणि पॅरामेडिकल स्टाफ देखील पाठवण्यात आलेत.


Turkey earthquake : धोका! देशातील 'या' भागांत होऊ शकतो तुर्कीसारखा विध्वंस; प्रशासनही सतर्क


दरम्यान, भूकंपाची तीव्रता लक्षात घेऊन राष्ट्राध्यक्ष अर्दोआन यांनी आणीबाणी (Emergency) जाहीर केली होती. हजारो लोक जखमी असल्याचं पहायला मिळतंय. तुर्की सिरीयानंतर न्यूझीलंडमध्ये (New Zealand Earthquake) देखील भूकंप झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आता जगाचा अंत समोर आलाय का? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.