मुंबई : २२ नोव्हेंबरपासून राजकीय जाहिरातबाजीला आळा घालण्याचा निर्णय ट्विटरने जाहीर केला आहे. ट्विटरचे प्रमुख जॅक डोरसे यांनी ही घोषणा केली आहे. राजकीय संदेश हा जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे मात्र त्याचा व्यापार होता कामा नये, असं डोरसे यांनी म्हटलंय. ट्विटरच्या या निर्णयाचं डेमॉक्रॅट्सनी स्वागत केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फेसबुकने मात्र राजकीय जाहिरातबाजीवर बंदी घालण्यास नकार दिला आहे. फेसबुकचा सीईओ मार्क झुकरबर्गने इन्वेस्टर्स कॉलमध्ये म्हटलं होतं की, 'एका लोकशाहीमध्ये मला नाही वाटत की कोणत्याही खासजी कंपनीकडून राजकारण्यांच्या बातम्यांना सेंसर केलं पाहिजे.' 


फेसबुकवर असलेल्या मोठ्या प्रमाणात युजर्सची संख्या पाहता याचा वापर राजकारण्यांकडून आपल्या जाहिरातबाजीसाठी होता. अमेरिकेच्या निवडणुकीत तर याचा सर्रास वापर केला गेला. पण फेसबूकच्या डेटाचा चुकीचा वापर देखील झाला. त्यामुळे फेसबुक अनेकदा चौकशीच्या आणि कायद्याच्या कचाट्यात सापडला. अमेरिकेत झालेल्या निवडणुकांमध्ये देखील याचा चुकीच्या पद्धतीने वापर केला गेला.