जगभरात चर्चेचा विषय बनलेले ट्विटर (twitter) हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म विकत घेतल्यानंतर, अब्जाधीश एलॉन मस्क (elon musk) यांनी एका युजर्सच्या ट्विटला उत्तर देताना सांगितले की, ट्विटर (twitter) आपली युजर व्हेरिफिकेशन (User Verification) प्रक्रिया बदलणार आहे. रविवारी ट्विटरवर ब्लू टिक (Blue Tick) काढण्यासंदर्भात ट्रेंडही (Trend) सुरु होता. त्यामुळे आता युजर व्हेरिफिकेशनची (User Verification) प्रक्रिया बदलणार आहे. सध्या संपूर्ण व्हेरिफिकेशन प्रक्रियेत आमूलाग्र बदल केला जात आहे, असे एलॉन मस्क (User Verification) यांनी म्हटलं आहे. मात्र, या संदर्भात त्यांनी सविस्तर माहिती दिली नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्लू टिक घेण्यासाठी तुम्हाला द्यावे लागतील पैसे?


रॉयटर्सने प्लॅटफॉर्मरच्या हवाल्याने म्हटले आहे की ट्विटर (twitter) युजर्सच्या अकाउंटची पडताळणी करण्यासाठी आणि ब्लू टिक (Blue Tick) देण्यासाठी शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. अहवालानुसार, ट्विटर युजर्सना ब्लू टिक कायम ठेवण्यासाठी म्हणजेच त्यांचे अकाउंट व्हेरिफाय (verify account) करण्यासाठी 4.99 डॉलर म्हणजेच सुमारे 415 रुपये प्रति महिना भरावे लागतील.


मात्र, अद्याप एलॉन मस्क (elon musk) यांनी याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही आणि हा संपूर्ण प्रकल्पही नाकारला जाऊ शकतो. माहितीनुसार, हे व्हेरिफिकेशन (User Verification) ट्विटर ब्लूचा एक भाग असण्याची शक्यता आहे.


द व्हर्जच्या वृत्तानुसार, ट्विटर ब्लूसाठी सबस्क्रिप्शन शुल्क वाढवू शकते. याद्वारे युजर्सची पडताळणीही केली जाते. द वर्जने अंतर्गत पत्रव्यवहारातून सांगितले की हे शुल्क 4.99 डॉलर ते 19.99 डॉलर प्रति महिना असू शकते.



ट्विटर ब्लू गेल्या वर्षी जूनमध्ये लॉन्च करण्यात आले होते. ट्विटर ब्लू युजर्सना विशेष मासिक सदस्यता तसेच त्यांचे ट्विट एडिट करता येते. मात्र, एलॉन मस्क यांनी एप्रिलमध्ये एक सर्वेक्षण केले होते ज्यात लोकांना ट्विट्स एडिट करावे की नाही हे विचारले होते, ज्याला 70 टक्के लोकांनी सहमती दर्शविली होती. यानंतर या महिन्याच्या सुरुवातीला काही युजर्सना ट्विट एडिट करण्याची सुविधा देण्यात आली होती.


एलॉन मस्क यांनी 4 एप्रिल रोजी जाहीर केले की ते कंपनीतील उर्वरित 9.2 टक्के भागभांडवल 44 बिलियन डॉलरमध्ये विकत घेणार आहेत, ज्यामुळे ते सर्वात मोठा भागधारक बनले आहेत. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटरवर फेक अकाउंटची संख्या ट्विटरच्या दाव्यापेक्षा जास्त आहे या चिंतेचा हवाला देत मेच्या मध्यापर्यंत मस्क यांनी खरेदीबद्दल आपला विचार बदलला होता. त्यानंतर त्यांनी जाहीर केले की त्यांना यापुढे 44 अब्ज डॉलरच्या करारासह पुढे जायचे नाही. ट्विटरने असा युक्तिवाद केला की अब्जाधीश कंपनी विकत घेण्यासाठी कायदेशीररित्या वचनबद्ध आहे आणि खटला दाखल केला. ट्विटर ग्रुपने त्याला करार पूर्ण करण्यासाठी किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यासाठी 27 ऑक्टोबरची मुदत दिली होती. मात्र एलॉन मस्क यांनी हा करार पूर्ण करायचे ठरवले आहे.