जपान : मच्छर मारल्याचा फोटो ट्विटरवर अपलोड केल्याने जपानमध्ये चक्क एका व्यक्तीचं ट्विटर हॅन्डल बॅन करण्यात आल्याचे वृत्त आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

@nemuismywife नामक एका व्यक्तीचं ट्विटर हॅन्डल दोन वेळेस याच एका कारणामुळे बंद झाले आहे. २० ऑगस्ट रोजी @nemuismywife या व्यक्तीने एक ट्विट केले. त्यामध्ये मारलेल्या मच्छरच्या फोटोखाली एक कॅप्शन लिहले होते. 'जेव्हा मी आरामात टीव्ही बघायचा प्रयत्न करत होतो तेव्हा तू मला चावयला आला होता ? मर आता ! ( वास्तवात तू आधीच मेला आहेस) असे ट्वीट झाल्यानंतर काही वेळातच ट्विटरकडून nemuismywife हे अकाऊंट फ्रीझ करण्यात आले तसेच हे अकाऊंट पुन्हा अ‍ॅक्टिव्हेट होणार नसल्याचेही सांगण्यात आले. 


ट्विटर युजरनेही हार न मानता पुन्हा २६ ऑगस्टला @DaydreamMatcha नावाने एक नवं अकाऊंट सुरू केले. मच्छर मारण्याच्या कारणावरून माझं अकाऊंट कसं बंद होऊ शकते ? याबाबत त्याने विचारणा केली.  यानंतर या ट्विटला हजारोंनी लाईक आणि रिट्विट केले. 
ट्विटरवर या घटनेबाबत खिल्ली उडवली जात आहे. पण आता नवीन अकाऊंटही ट्विटरने बंद केले आहे. काही आक्षेपार्ह की वर्ड्सचा वापर केल्याने ट्विटरकडून अशाप्रकारची कारवाई केली जाते.