राष्ट्राध्यक्षांशी पंगा घेणं Twitter ला पडलं भारी, या देशात भारतीय Koo App ची एंट्री
Koo आता भारताशिवाय नायजेरियामध्ये देखील वापरलं जाणार आहे.
नवी दिल्ली : भारत सरकार आणि ट्विटर (Government vs Twitter)मध्ये वाद सुरु असताना नायजेरियामध्ये ट्विटर सस्पेंड करण्यात आलं आहे. दिया. यानंतर आता नायजेरियामध्ये भारतीय मायक्रोब्लॉगिंग साईट कू Koo ची एंट्री झाली आहे. Koo आता भारताशिवाय नायजेरियामध्ये देखील वापरलं जाणार आहे.
नायजेरियाच्या भाषेत Koo
कू (Koo) ने म्हटलं की, भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म नायजेरियामध्ये देखील आता उपलब्ध आहे. कू ने म्हटलं की, नायजेरियाच्या यूजर्ससाठी तेथील स्थानिक भाषेत आम्ही जोडले जाणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे, नायजेरिया सरकारने Koo App चा स्पर्धक ट्विटर (Twitter) वर बंदी घातली आहे. Koo च्या एका पोस्टमध्ये सह-संस्थापक आणि सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी म्हटल की, 'हा प्लॅटफॉर्म आता नायजेरियामध्ये उपलब्ध झाला आहे.'
Koo चे सीईओ अप्रमेय राधाकृष्ण यांनी म्हटल की, आम्ही तेथील स्थानिक भाषेसोबत जोडण्याचा विचार करत आहेत. राधाकृष्ण यांनी म्हटलं की, आता आमच्यासाठी नायजेरिया एक संधी आहे. कू कंपनीला स्थानिक भाषांसोबत जुडायचं आहे.'
ट्विटरने दोन दिवसाआधी नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मदु बुहारी यांचं अधिकृत अकाउंटवरील ट्विट डिलीट केलं होतं. यानंतर नायजेरियाने ट्विटरवर अनिश्चितकाळासाठी बंदी घातली आहे. नायजेरियाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने म्हटलं आहे की, 'ट्विटरचा वापर देशातील कॉर्पोरेटला अपमानित करण्यासाठी केले जात आहे, त्यामुळे सरकारने ट्विटरवर अनिश्चित काळासाठी निलंबनाची घोषणा केली आहे.'