मुंबई : काही वर्षांपूर्वी मलेशियात 8 मुले आजारी पडली होती. त्यांना न्युमोनिया झाला होता. पण जेव्हा त्याचे नमुने तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले गेले तेव्हा नवीन कोरोना विषाणूची लागण झाल्याचं समोर आलं. हा कोरोना विषाणू कुत्र्यांमध्ये आढळतो. एका अभ्यासात ही माहिती आता समोर आली आहे. या कोविड 19 च्या व्हायरस आधी लोकांना कोरोना विषाणूचे फक्त सात प्रकार माहित होते. आता नवीन कोरोना विषाणूचा शोध लागला आहे, तो कदाचित डुकरपासून मनुष्यांपर्यंत आला असेल. ही बाब जुनी आहे, परंतु अद्यापही ती जागतिक स्तरावर लोकांच्या दृष्टीने धोकादायक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयोवाचे विषाणूशास्त्रज्ञ स्टॅनले पर्लमॅन म्हणाले की, आपण जितके जास्त खोलवर जाऊ तितका उलगडा होऊ शकेल. यावरून कळेल की कोरोना विषाणू एका जातीतून दुसर्‍या प्रजातीमध्ये कसा प्रवेश करत आहे.कॅनिनेलाइक कोरोनाव्हायरस  (Caninelike Coronavirus) आणि फ्लिन कोरोनाव्हायरस (Feline Coronavirus) याचा लोकांना संसर्ग झाल्याची नोंद आहे. परंतु एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पसरला आहे, याबद्दल कोणतीही ठाम माहिती मिळाली नाही.


दुसरीकडे, काही वैज्ञानिकांचा असा दावा आहे की, विषाणू कोणत्याही मनुष्यात किंवा जीवात बदल घडवून आणू शकतो. त्याच्यात स्वत: ची उत्क्रांती करण्याची क्षमता आहे. मलेशियन रूग्णात आढळलेल्या कोरोना विषाणूमध्ये चार वेगवेगळे प्रकार आढळले आहेत.


कुत्र्यांमध्ये आढळणारा कोरोना व्हायरस (Canninelike Coronavirus) मनुष्यात देखील वाढू शकतो. यावर शोध सुरु आहे.