अबुधाबी : युएईमधील भारतीय वंशाचे अब्जाधीश बी.आर शेट्टी हे आपला फिनाब्लर पीएलसी (Finablr Plc) चा व्यवसाय इस्त्रायली-युएई मधील कंपनीला फक्त 1 डॉलर (73.52 रुपये) मध्ये विकत आहेत. बीआर शेट्टी मागील वर्षापासून आर्थिक संकटात आले होते. त्यांच्यावर मोठं कर्ज आहे. तसेच त्यांच्या विरोधात फसवणुकीची चौकशी देखील सुरु आहे. आज त्यांच्या बिझनेसची मार्केट वॅल्यू फक्त 1.5 बिलियन पाउंड ($2 बिलियन) राहिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीआर शेट्टी यांच्या फायनेंशियल सर्विस कंपनी फिनाब्लरने घोषणा केली आहे की, ग्लोबल फिनटेक इन्वेस्टमेंट्स होल्डिंग (Global Fintech Investments Holding) सोबत ते करार करत आहेत. GFIH इस्राईलच्या प्रिज्म ग्रुप (Prism Group) ची सहकारी कंपनी आहे. ज्यांना Finablr Plc लिमिटेड संपूर्ण संपत्ती विकत आहे. इस्राईलचे माजी पंतप्रधान एहुद ओलमर्ट (Ehud Olmert) यांच्याशी संबंधित असलेल्या प्रिज्म ग्रुपने या बाबत व्यवहार करण्यासाठी अबुधाबीच्या रॉयल स्ट्रेटेजिक पार्टनर्स (Royal Strategic Partners) सोबत एक कमिटी स्थापन केली आहे.


मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये फिनाब्लरची मार्केट वॅल्यू $ 2 बिलियन इतकी होती. एप्रिलमध्ये त्यांच्यावर $1 बिलियनपेक्षा अधिकचं कर्ज होतं.


Finablr Plc शिवाय शेट्टी यांची अबुधाबी येथील कंपनी एनएमसी हेल्थचे शेअर डिसेंबरमध्ये 70 टक्क्यापेक्षा खाली गेले आहे. भारतीय मुळचे अरबपती शेट्टी यांच्या कंपन्यांविरोधात फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे. ज्यामुळे मागच्या वर्षीच कंपनीच्या शेअरवर स्टॉक एक्सचेंजमध्ये खरेदी-विक्रीस बंदी घालण्यात आली होती.


यूएईमध्ये हेल्थकेयर इंडस्ट्रीच्या माध्यमातून करोडोंची संपत्ती कमवणारे 77 वर्षाचे शेट्टी पहिले भारतीय आहे. त्यांनी 1970 मध्ये एनएमसी हेल्थची सुरुवात केली होती. त्यानंतर 2012 मध्ये लंडन स्टॉक एक्सचेंजवर ती लिस्ट झाली. 70 च्या दशकात शेट्टी फक्त आठ डॉलर घेऊन यूएईला आले होते. मेडिकल रिप्रेजेंटेटिव म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली होती.


बीआर शेट्टी यांनी 1980 मध्ये अमीरातमध्ये सर्वात जुनी रेमिटेंस बिझनेस यूएई एक्सचेंजची सुरुवात केली. यूएई एक्सचेंज, यूकेची एक्सचेंज कंपनी ट्रॅवलेक्स सह छोट्या-छोट्या पेमेंट सोल्यूशंस प्रोवाईडर्स आणि शेट्टींची फिनब्लर सोबत 2018 मध्ये सार्वजनिक झाली होती. शेट्टी यांनी हेल्थकेयर आणि फायनॅनशल सर्विसेजसह हॉस्पिटेलिटी, फूड अँड बेवरेज, फार्मास्यूटिकल मॅन्युफॅक्चरिंग तसेच रिअल इस्टेटमध्ये देखील त्यांनी व्यवसाय केला.