पक्षी उडवा, दिवसाला 20 हजार रुपये कमवा! अजब काम असलेली गजब नोकरी
आजपर्यंत आपण अनेक तास झोपून राहणे, जेवण टेस्ट करणे अशा अनेक चित्र विचित्र नोकऱ्यांबद्दल ऐकले आहे. आता एका कंपनीने पक्षी उडवण्याची नोकरी ऑफर केली आहे.
Weird Jobs: सध्या संपूर्ण जगासमोर बेरोजगारीची समस्या आहे. लाखो तरुण तरुणी नोकरीच्या शोधात आहे. उच्च शिक्षित तरुण तरुणी देखील नोकरीच्या शोधात आहेत. तर, सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोकर कपात केली जात आहे. यामुळे अनेकांवर नोकरी गमावण्याची भिती असल्याची टांगती तलवार आहे. यामुळे अनेकांची आहे ती नोकरी टिकवण्याची धडपड असते. तर, नोकरीच्या शोधात असलेले बेरोजगार त्यांचे क्षेत्र सोडून कोणत्याही क्षेत्रात नोकरी करण्यास तयार होतात. अशाच लोकांसाठी अजब काम असलेली गजब नोकरीची ऑफर आहे. पक्षी उडवा, दिवसाला 20 हजार रुपये कमवा अशी ही ऑफर आहे.
पक्षी उडवण्याची नोकरी चर्चेत
पक्षी उडवण्याची ही नोकरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. यूकेमधील चिप्स चिपी नावाच्या कंपनीने ही नोकरीची ऑफर दिली आहे. या कंपनीने पक्षी उडवण्याच्या पदासाठी भरती करण्याची घोषणा केली आहे. या पदासाठी नोकरी करणाऱ्यांना फक्त पक्षी उडवण्याचे काम करावे लागणार आहे. यासाठी कंपनी दिवसाला 20 हजार रुपये इतका पगार देणार आहे. म्हणजेच या कंपनीच काम करणाका व्यक्ती महिन्याला लाखो रुपयांची कमाई करु शकतो.
कंपनीला का पाहिजे आहेत पक्षी उडवणारे कर्मचारी?
यूकेमधील चिप्स चिपी नावाची कंपनी फिश चिप्स बनवते. कंपनीच्या कारखान्यात हे फिश चिप्स वाळवताना आणि साठवताना मोठ्या अडचणी येतात. सिगल अर्थता समुद्र पक्षी हे फिश चिप्स खातात तसेच यांची नासधुस करतात. यामुळे उत्पादनाचा दर्जा खालवतो. परिणामी कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होते. बऱ्याचदा हे पक्षी येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर देखील हल्ला करतात. यामुळे या पक्षांचा सामना करुन त्यांना उडवून लावणारे कर्मचारी कंपनीला पाहिजे आहेत.
कंपनीने असा निवडला कर्मचारी
या पदासाठी कर्मचारी नियुक्त करताना नोकरीच्या ठिकाणी त्यांची परीक्षा घेण्यात आली. आपल्या शक्तीचा आणि बुद्धीचा वापर करुन पक्षी उडवा असे कंपनीने नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना सांगितले होते. अनेकांनी या नोकरीसाठी प्रयत्न केले. अनेक जण पक्षांचा सामना करु शकले नाही. बऱ्याच लोकांवर पक्षांनी हल्ला. एका व्यक्तीने मात्र, बुद्धीचा वापर करुन नोकरी मिळवली आहे. हा व्यक्ती गरुडाची वेशभुषा करुन आला होता. यामुळे गरुड असल्याचे भास झाल्याने पक्षी प्लांटच्या आसपास फिरकले नाहीत तसेच कुणावर हल्ला देखील केला नाही. कंपनीला या व्यक्तीची कल्पना खूपच आवडली. कंपनीने याच व्यक्तीला ही नोकरी दिली आहे.