बिस्टल : ब्रिटनच्या 72 वर्षीय रिटायर्ड ड्रायविंग टीचर असलेल्या डेव स्मिथची गोष्ट जबरजस्त चर्चेत आहे. स्मिथ यांना गेल्या 10 महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग झाला आहे. ते आतापर्यंत 7 वेळा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांची हिम्मत पाहून डॉक्टर देखील चकीत झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 10 महिन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्या स्मिथ यांची 43 वेळा कोविड टेस्ट करण्यात आली. या सर्व टेस्ट आतापर्यंत पॉझिटिव्ह आल्या आहेत. तसेच प्रकृती खालावल्याने त्यांना आतापर्यंत 7 वेळा रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यानंतरही त्यांनी कोरोनाशी दोन हात करत ठणठणीत बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना जादुई व्यक्ती म्हणत आहेत


कमी झाले 60 किलो वजन
जगात सर्वात जास्त वेळ संसर्ग झालेले स्मिथ हे पहिलेच व्यक्ती आहे. त्यांच्यासाठी हे एक वर्ष भयावह होते.


वायरसशी लढण्यासाठी स्मिथला एक विशेष ऍंटीबॉडी ट्रिटमेंट दिली होती. या दरम्यान त्यांचे 60 किलो वजन कमी झाले होते.  दरम्यान त्यांना रात्र रात्रभर खोकला असायचा. आता त्यांची प्रकृती उत्तम आहे.