लंडन : बर्गंडी रंगाऐवजी इंग्लडच्या पासपोर्टचा रंग निळा असणार आहे


इंग्लंडचं ब्रेक्झिट 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या इंग्लंडची युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू आहे. यालाच ब्रेक्झिट असं म्हणतात. युरोपियन युनियनमधल्या राष्ट्रं पासपोर्टसाठी बर्गंडी रंगाचा वापर करतात. 


पासपोर्टचा निळ्या रंगाचा


युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर इंग्लंडच्या पासपोर्टचा निळ्या रंगाचा असेल. त्याचबरोबर सोनेरी रंगाचासुद्धा वापर केला जाईल. युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर आम्हाला आमच्या राष्ट्राची ओळख जपता येईल त्याचबरोबर नवीन संधींचा शोध घेता येईल, असं वक्तव्य इंग्लंडचे एक मंत्री ब्रॅँडन लेवीस यांनी केलं आहे.


सर्वात सुरक्षित पासपोर्ट


नवीन पासपोर्टबद्दल बोलताना ब्रॅँडन लेवीस म्हणाले, हे प्रवासासाठी जगातल्या सर्वात सुरक्षित दस्ताऐवजापैकी एक असेल. यात अत्याधुनिक सुरक्षा बाबींचा समावेश असेल. यामुळे फ्रॉड तसंच इतर कोणत्याही गैरप्रकारात याचा वापर करणं अवघड असेल. सध्याचा पासपोर्ट हा कागदापासून बनलेला असून नवीन पासपोर्ट हा कार्यक्षम अशा प्लॅस्टिक म्हणजेच पॉलीकार्बोनेटचा बनलेला असेल. 


नव्या युगाची नांदी


निळा आणि सोनेरी रंग हा इंग्लडमध्ये 1921 पासून वापरात होता. त्याचच पुनरुज्जीवन केलं जाईल. ब्रेक्झिटच्या निमित्ताने इंग्लंड कात टाकतय. पासपोर्टच्या रंगापासून सरकारच्या धोरणापर्यंत सर्वकाही नव्यानेच ठरविण्यात येतंय. इंग्लंडच्या नव्या युगाचीच ही नांदी आहे.