पंतप्रधान मोदींवरील BBC Documentary वर भाष्य करणाऱ्या खासदाराला ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी झापलं
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने तयार केलेल्या माहितीपटावरुन वाद निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या माहितीपटावर टीका केली असून हा पंतप्रधान मोदींच्या विरुधोतील अप्रप्रचाराचा भाग असल्याचं म्हटलं आहे
UK PM Rishi Sunak on BCC Documentary over Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनने(BBC ) तयार केलेल्या माहितीपटावरुन (Documentry) वाद निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने या माहितीपटावर टीका केली असून हा पंतप्रधान मोदींच्या विरुधोतील अप्रप्रचाराचा भाग असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये 2002 गुजरात दंगलीचा संदर्भ देत मोदींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. दरम्यान ब्रिटनच्या संसदेत पाकिस्तानी वंशाच्या खासदाराने हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्याला गप्प केलं.
खासदार नेमकं काय म्हणाले?
"परराष्ट्र आणि राष्ट्रकुल कार्यालयाच्या स्वतःच्या शब्दात नरेंद्र मोदी हिंसाचारासाठी थेट जबाबदार होते. शेकडो क्रूरपणे मारले गेले आणि ब्रिटनसह भारत आणि जगभरातील कुटुंबांना अजूनही न्याय मिळत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंसाचारासाठी थेट जबाबदार होते या परराष्ट्र कार्यालयाच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? हिंसाचाराच्या या गंभीर कृत्यात मोदींच्या सहभागाबद्दल परराष्ट्र मंत्रालयाला आणखी काय माहिती आहे?," अशी विचारणा खासदार इम्रान हुसेन यांनी केली.
ऋषी सुनक यांनी झापलं
यानंतर ऋषी सुनक यांनी म्हटलं की, "माननीय अध्यक्ष, ब्रिटन सरकारची भूमिका अगदी स्पष्ट असून त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा विरोध करतो हे स्पष्ट आहे. पण हे महाशय जे बोलत आहेत त्यांच्याशी मी सहमत आहे की नाही याबाबत मला खात्री नाही".