मोठी बातमी । रशियाची 5 लष्करी विमाने पाडली, युक्रेनचा दावा
Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील वाद मिटण्याऐवजी इतका टोकाला गेला की त्याचे परिणाम युद्धात दिसून येत आहे. दरम्यान, युक्रेनने रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे. रशियाची पाच लष्करी विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.
कीव : Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील वाद मिटण्याऐवजी इतका टोकाला गेला की त्याचे परिणाम युद्धात दिसून येत आहे. रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारले. (Russia Ukraine Conflict) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनमध्ये लष्करी कारवाई करण्याची घोषणा केली आणि युक्रेनमधील शहरांवर हल्ले सुरु झालेत. दरम्यान, युक्रेनने रशियाला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचे म्हटले आहे. रशियाची पाच लष्करी विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे. (Ukraine claims to have shot down 5 Russian military planes)
रशियाकडून जोरदार लष्करी कारवाई करण्यात येत आहे. युक्रेनच्या लष्कराला शस्त्र खाली ठेवा आणि आपल्या घरी निघून जा असेही रशियाने बजावले आहे. इतकेच नाही तर अमेरिकेसह इतर युरोप देशमध्ये पडल्यास त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा रशियाने दिला आहे. रशियाच्या युद्धानंतर युक्रेनची राजधानी कीवमध्ये शहर हल्ल्याखाली असल्याचे दर्शवणारे एअर रेड सायरन्स वाजले आहेत.
दरम्यान, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी मार्शल लॉची घोषणा केली आहे. तसेच रशियाने हल्ला सुरु केला असली तरी घाबरु नका, असे आवाहन केल्याचे वृत्त एपी या वृत्तसंस्थेने दिले आहे. 'मार्शल लॉ' घोषित केल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांचे हक्क काढून घेत देशाच्या कामकाजावर लष्कराचे नियंत्रण आणले गेले आहे. रशियाला प्रत्युत्तर देताना पाच लष्करी विमाने पाडल्याचा दावा युक्रेनने केला आहे.