Russia Ukraine war : रशिया आणि युक्रेन (Russia ukraine war) यांच्यातील संघर्षाचा आज 13 वा दिवस आहे. दोन वेळा बैठकीनंतर सोमवारी पुन्हा दोन्ही देशांमध्ये चर्चेची तिसरी फेरी झाली, मात्र त्यातून ही समाधानकारक निर्णय झालेला नाही. मात्र, या बैठकीत शहरांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी मानवतावादी मार्ग तयार करण्याबाबत काही सकारात्मक चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पुन्हा ह्युमन कॉरिडॉर उघडला जाणार आहे. दुसरीकडे, यूएन एजन्सीने सांगितले की, रशियन हल्ल्यानंतर 17 लाखांहून अधिक युक्रेनियन देश सोडून मध्य युरोपमध्ये पोहोचले आहेत.


युद्धामुळे युक्रेनचे खूप नुकसान झाले असून राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांच्यावरही लवकरच शांतता प्रस्थापित करण्याचा दबाव आहे. दरम्यान, अशी बातमी आहे की व्होलोडिमिर झेलेन्स्की क्रिमिया आणि डॉनबास बाबत रशियाशी चर्चेसाठी तयार आहे. रशिया त्यांना युक्रेनपासून वेगळे ठिकाण म्हणून पाहतो. डॉनबासमध्येच दोन क्षेत्रे आहेत (लुहान्स्क, डोनेस्क) ज्यांना रशियाने स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली होती.


रशियाने युक्रेनविरुद्धचे युद्ध थांबवण्यासाठी एक पाऊल पुढे येण्याचं मान्य केलं आहे. पण यासाठी रशियाने यूक्रेनपुढे 4 अटी ठेवल्या आहेत. यूक्रेन जर या 4 अटी मान्य करतो तर हे युद्ध त्वरित थांबवले जाईल, असे रशियाने म्हटले आहे.


रशियाच्या 4 अटी कोणत्या?


1. लष्करी कारवाई थांबवा.
2. तटस्थ राहण्यासाठी संविधान बदलले पाहिजे.
3. क्रिमियाला (crimea) रशियन प्रदेश म्हणून मान्यता द्या.
4. Donetsk आणि Luhansk यांना स्वतंत्र देश म्हणून ओळख द्या.


युद्धाच्या दरम्यान, कीवमध्ये रशियन सैन्याकडून मोठ्या हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. रशियाचे वॅगनर पथक कीवमध्ये प्रवेश करू शकते, असे युक्रेनचे म्हणणे आहे. कीव प्रदेशाच्या उत्तर आणि वायव्य भागात रशियन सैन्य उपस्थित आहे. बाकी पूर्वेकडूनही रशियन फौजा येण्याची शक्यता आहे.