Lashkar-e-Taiba chief Hafiz Saeed Son: पाकिस्तानमध्ये सध्या लश्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदचा मुलगा कमालुद्दीनची प्रकृती गंभीर असल्याची चर्चा आहे. काही मास्क घातलेले लोक कमालुद्दीनला एका एसयुव्ही कारमधून कुठेतरी घेऊन गेल्याचं सांगितलं जात आहे. जिदाहचा दबदबा असलेल्या प्रातांमध्ये कमालुद्दीनच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र कमालुद्दीनचं अपहरण करण्यात आल्याच्या दाव्यासंदर्भातील खरी माहिती समोर आली आहे. लश्कर-ए-तोयबामध्ये मागील काही काळापासून अंतर्गत संघर्षाने तोंड वर काढलं आहे. संघटनेमधील विरोधी गट एकमेकांच्या गटातील लोकांची हत्या करत असल्याची चर्चा पाकिस्तानमध्ये आहे. मात्र आता हा संघर्ष शिगेला पोहचल्याची चर्चा आहे.


त्या हत्येनंतर आयएसआयने पुरवली 12 दहशतवाद्यांना सुरक्षा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लश्कर-ए-तोयबाचा सदस्य आणि मुख्य मौलवी मौलाना जियाउर रहमानची हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयने एक डझनहून अधिक दहशतवाद्यांना सुरक्षित ठिकाणी हलवल्याचं सांगितलं जात आहे. रहमानची काही दिवसांपूर्वीच कराचीमधील गुलिस्तान-ए-जौहर येथे गोळी झाडून हत्या करण्यात आली. 'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार सायंकाळी बागेत वॉकसाठी गेलेल्या रहमानवर 2 अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. रहमानवर अनेक गोळ्या झाडण्यात आल्या. यात रहमानचा जागीच मृत्यू झाला. 


तल्हाची सुरक्षा वाढवण्यात आली


ही घटना ताजी असतानाच हाफिज सईदचा दुसरा मुलगा तल्हाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हाफिज सईदचा मुलगा असलेला तल्हा हा त्याच्या वडिलांनंतर लश्कर-ए-तोयबाचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता मानला जातो. एकीकडे तल्हाची सुरक्षा वाढवण्यात आलेली असतानाच अचानक हाफिज सईदचा थोरला मुलगा कमालुद्दीनला अचानक काही मास्क घतलेल्या लोकांनी एसयुव्हीमध्ये टाकून घेऊन गेल्याचं दिसून आलं. यानंतर कमालुद्दीनचं अपहरण झाल्याची चर्चा सुरु झाली. मात्र कमालुद्दीनच्या अपहरणाच्या बातम्या अफवा असल्याची माहिती समोर आली. लश्कर-ए-तोयबाच्या लोकांबरोबरच कमालुद्दीन एका गुप्त ठिकाणी गेला असल्याचं समजतं. तो नेमका कुठे आणि कशासाठी गेला आहे याबद्दलची सविस्तर माहिती समोर आलेली नसली तरी त्याचं अपहरण झालेलं नाही असं सांगण्यात आलं आहे. तरी या दाव्याबद्दलही शंका उपस्थित केली जात आहे.


मागील 1 महिन्यात तिसरी हत्या


पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयने आपल्या दहशतवादी कारवायांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये हल्ले घडवण्याच्या इराद्याने 'द रेजिस्टेंस फ्रंट'ला संरक्षण देत युद्धविरामाची घोषणा केली आहे. जिया-उर-रहमानच्या हत्येनंतर एक महिन्यात लश्कर-ए-तोयबाशीसंबंधित तिसऱ्या व्यक्तीची हत्या झाली आहे. अबू कासिमला काश्मीरी रावलकोटमध्ये मारला गेला. कारी खुर्म शहजाद निजामाबादमध्ये मारला गेला. रहमानची हत्या खालिस्तानी कमांडो फोर्सचा प्रमुख परमजीत सिंग पंजवारच्या हत्येप्रमाणेच घडवण्याच्याची चर्चा आहे. सकाळी वॉकला गेलेल्या परमजीत सिंग पंजावारवरही अज्ञातांनी गोळीबार करुन त्याची हत्या केलेली.