मुंबई : लहानपणापासून अनेकांच्या मनात हा प्रश्न असतो की, आपल्या या जगाचा शेवट किंवा आरंभ असेलच आणि प्रत्येकाला तो पाहाण्याची उत्सुकता असते. लोकांना नेहमी वाटत असतं की, जगाच्या पाठीवर असा कोणता तरी कोपरा असेलच, जेथे जग संपत असेल. लोकांना याचे फारच अप्रुप वाटते. परंतु स्वप्नात विचार करत असलेला हा कोपरा किंवा हा जगाचा शेवटचं टोक सापडलं आहे. चला तर मग याबद्दल जाणून घेऊ या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला जगातील अशा रस्त्याबद्दल सांगणार आहोत, ज्याला जगातील शेवटचा रस्ता म्हटले जाते. म्हणजेच या रस्त्यानंतर जग संपते.


हा रस्ता E-69 म्हणून ओळखला जातो. जो आपल्याला जगाच्या टोकाकडे घेऊन जातो. हा रस्ता नॉर्वेमध्ये येतो, ज्याबद्दल असे म्हटले जाते की, या देशात फक्त 40 मिनिटांची रात्र असते.



पृथ्वीवरील सर्वात दूरचा बिंदू म्हणजे उत्तर ध्रुव. या ठिकाणी पृथ्वीचा अक्ष फिरतो. इथे नॉर्वे हा देश येतो. येथून जाणारा रस्ता हा जगातील शेवटचा रस्ता असल्याचे म्हटले जाते. या रस्त्यासमोर दुसरा कोणताही रस्ता नाही किंवा दुसरी जमीन नाही. त्याच्या पुढे आहे ते फक्त बर्फ आणि समुद्र.


E-69 रस्त्याची लांबी 14 किलोमीटर आहे. परंतु येथे एकट्याने चालण्यास किंवा वाहन चालविण्यास पूर्णपणे बंदी आहे. या रस्त्यावर अनेक किलोमीटरपर्यंत बर्फाची जाड चादर साचली असून त्यामुळे येथे नेहमीच अपघाताचा धोका असतो. त्यामुळे तुम्हाला कितीही इच्छा असली तरी तुम्ही जाऊ शकत नाही.


हा रस्ता उत्तर ध्रुवाजवळ आहे. यामुळे हिवाळ्यात येथे फक्त रात्र असते. कधी कधी इथे सतत सहा महिने सूर्य देखील दिसत नाही. येथे हिवाळ्यात तापमान उणे ४३ अंशांपर्यंत पोहोचते.