UNHRCमध्ये पाकिस्तानने उपस्थित केला काश्मिरचा मुद्दा, असे उत्तर मिळाले नेहमी हे लक्षात ठेवा!
आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता.
मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला आहे. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (यूएनएचआरसी) काश्मिरचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी भारताने जोरदार प्रतिउत्तर दिले. आधी स्वत:चे आत्मपरीक्षण करा, असे बजावले. यूएनएचआरसीमध्ये भारताच्या कायमस्वरुपी मिशनचे पहिले सचिव सेन्थिल कुमार यांनी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय मंचचा गैरवापर केल्याचा आरोप केला. ते म्हणालेत, ही बाब दुदैवी आहे. नरसंहार करणारे दुसऱ्यांकडे बोट दाखवत आहे.
जिनिव्हा येथे झालेल्या मानवाधिकार परिषदेच्या ४३ व्या अधिवेशनात सेन्थिल कुमार यांनी पाकिस्तानच्या आरोपांचा जोरदार समाचार घेतला. पाकिस्तान यूएनएचआरसी आणि तिच्या प्रक्रियेचा दुरुपयोग करीत आहे. दक्षिण आशियातील हा एकमेव देश आहे ज्याचे सरकार स्वतः नरसंहार करत आहे आणि तरीही इतरांवर आरोप करण्याचे धाडस त्यांच्यात आहे. इतरांना अभिप्राय देण्यापूर्वी पाकिस्तानने स्वत: आत्मपरीक्षण करावे आणि केलेल्या चुका आणि मानवी हक्कांचे उल्लंघन यावर डोकावले तर बरे होईल.
धार्मिक कट्टरतावाद आणि रक्तपात
अल्पसंख्यांकांवरील अत्याचाराच्या मुद्यावर पाकिस्तानला घेराव घालून ते म्हणाले की, धार्मिक कट्टरतावाद आणि रक्तपात यांनी बनलेला देश. ज्यांच्या इतिहासामध्ये अशा घटना घडल्या आहेत. तेथे केवळ अल्पसंख्यांकांना भीती घालण्यासाठी निंदा करण्याचा उपयोग केला जातो. लाहोर, चलेकी आणि सिंध येथे काय घडले हे सर्वांना माहिती आहे. २०१५ मध्ये पाकिस्तानमध्ये ५६ ट्रान्सजेंडर्सची हत्या करण्यात आली आणि सरकारला संरक्षण मिळाले. पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणण्यासाठी या घटना पुरेशी आहेत.
लोक कोठे गायब होत आहेत?
सेन्थिल कुमार येथेच थांबले नाहीत, त्यांनी बलुचिस्तानच्या मुद्यावर पाकिस्तानला बरेच काही सुनावले. ते म्हणाले, 'खैबर पख्तुनवामध्ये २५०० लोक बेपत्ता आहेत, हे लोक कोठे गायब झाले. हे कोणत्या गुन्हेगारीच्या श्रेणीत येते? या अदृश्य लोकांनी राजकीय, धार्मिक श्रद्धा आणि मानवी हक्कांचे रक्षण केले. ४७००० बलूच आणि ३५०० पश्तुनुन बेपत्ता आहेत. जातीय हिंसाचारात बलुचिस्तानमध्ये ५०० हजारा मारले गेले आणि एक लाखाहून अधिक लोकांना पाकिस्तान सोडण्यास भाग पाडले गेले. ' बलुचिस्तानमध्ये हिंसा आणि शोषण हे सामान्य आहे. तेथे मानवाधिकारांच्या अंतर्गत पाकिस्तान पायदळी तुडला आहे.
पाकिस्तानची विचारसरणी धोकादायक
जम्मू-काश्मीरमधून काढलेल्या अनुच्छेद ३७० वर बोलताना ते म्हणाले की, या निर्णयाचे कोणतेही बाह्य परिणाम झाले नाहीत. पाकिस्तान शांततेत अडथळा आणण्याचा सतत प्रयत्न करीत आहे, परंतु त्या असूनही खोऱ्यातील लोक पुढे जात आहेत. सेन्थिल कुमार म्हणाले की, पाकिस्तान केवळ कौन्सिल आणि त्यांची प्रक्रिया अस्थिर करण्याचा प्रयत्न करीत आहे हे अत्यंत धोकादायक आहे.