Unique Love Story Viral Video : प्रेम ( Love) आंधळं असते हे आपण अगदी लहानपणापासून ऐकत आलो आहेत. म्हणतात प्रेमात रंग, धर्म, जात, वय अगदी आता मुलगा मुलगी या कशालाही सीमा राहिलेली नाही. आज फक्त प्रेम ही एक संकल्पना जगाचा आधार बनतं चालली आहे. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्यभर राहायचं बस एवढंच...मग तो मुलगा असो किंवा मुलगी...सर्वत्र व्हॅलेंटाईन डे (Valentine's Day 2023) साजरा करत असतानाच सध्या सोशल मीडियावर एक विचित्र लव्ह स्टोरी (Unique Love Story) जगाचं लक्ष वेधून घेते आहे. 


प्यार की किया तो डरना क्या!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपण विवाहबाह्य संबंधाच्या (Extramarital affair) अनेक घटना ऐकल्या आहेत. पण सोशल मीडियावरील प्रकरण ऐकून त्याला नेमकं म्हणायचं काय हा प्रश्नच पडतो. झालं असं की, एका महिलेचं तिच्या नवऱ्याशी (Husband wife video) लग्नानंतर काहीच महिन्यात भांडण झालं. पुढे ते दोघे वेगळे (Woman Left Husband) झाले. यानंतर ही महिला तिच्या एका विवाहित मित्राच्या घरी गेली. तिथे त्याचा बायकोला ही महिला भेटली आणि दोघींमध्ये संवाद सुरु झाला. गाठीभेटी वाढल्या आणि या दोघी प्रेमात पडल्या...गोष्टी इथेच थांब नाही पुढे या तिघांनी जो निर्णय घेतला त्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. 


तिघांनीही घेतला असा निर्णय...


पिड्डू, स्पिती आणि सनी असे या तिघांचं नाव असून ते मूळचे भारतीय आहेत. पण ते खूप आधीपासून अमेरिकेत राहतात. पिड्डूचं 2009 मध्ये अरेंज मॅरेज झालं होतं. पण नंतर तिचं घटस्फोट झालं. ती कॅलिफोर्नियाहून भारतात आली. सनी तेव्हा स्पितीसोबत राहत होता. सनीच्या घरी आठवडाभर राहिल्यानंतर पिडू आणि स्पिती प्रेमात पडल्या. त्यावेळी दोघींनीही हे नातं न लपवता सनीला सगळं सांगितलं. त्यानंतर या तिघांनी throuple relationship मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. (Unique Love Story woman fell in love with a close friend's wife and throuple relationship Ajab Gajab news trending video viral on Social media)



सनीसोबतच्या नात्याबद्दलच्या (Woman started living with married girl) एका व्हिडिओमध्ये स्पिती म्हणाली की, आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो. सनी आणि मी लहानपणापासून प्रेमळ होतो. पंजाबमध्ये जन्मल्यानंतर सनी आपल्या आई वडिलांसोबत न्यूयॉर्कला राहिला गेला. तेव्हा तो आठ वर्षांचा होता. आम्ही अनेक वर्षे डेट केलं आणि नंतर 2003 मध्ये आम्ही लग्न केलं. 



ती पुढे म्हणाली की, पिड्डसोबत रिलेनशिपमध्ये आल्यावर तिला खूप काळजी घ्यावी लागली. भावनांवर नियंत्रण, मत्सर, रोमान्ससाठी वेळेचं वाटप अशा अनेक गोष्टींसोबत स्लँगल केलं. पण हे नातं आज चांगल्या प्रकारे पुढे जातं आहे. 



कुटुंब आणि नातेवाईकांकडून...


या थ्रूपल रिलेनशिपबद्दल तिघांच्याही कुटुंबायांचं एकमत नव्हतं. नातेवाईकांनी टोमणे मारले, इतकंच नाही तर नातेवाईकांनी त्यांना लग्नात बोलावणंही बंद केलं होतं. या नात्याबद्दल सनीची आई म्हणाली की. सुरुवातीला या नात्याबद्दल भीती वाटतं होती. पण त्याने सर्वकाही अगदी छान हाताळलं. तर स्पितीच्या आईचं असं म्हणं होतं की, यापूर्वी अशा नात्याबद्दल कधीही ऐकलं नव्हतं. पण मुलं आनंदी असतील तर बाकी कसलाही फरक पडतं नाही. या तिघांना चार मुलंही आहेत.