Ghost Towns : काळ इतक्या वेगानं पुढे जात आहे, की या वेगाशी ताळमेळ साधणं अनेकांनाच शक्य होत नाहीये. परिणामी या धकाधकीमध्ये अनेक गोष्टी नकळतच फार मागे पडत चालल्या आहेत. जाणून आश्चर्य वाटेल किंवा थरकापही उडेल. कारण, येत्या 76 वर्षांमध्ये म्हणजेच साधारण 2100 पर्यंत जगातील अनेक शहरं निर्मनुष्य होऊन तिथं चिटपाखरुही फिरकणार नाहीये. महासत्ता (America) अमेरिकेचाही या समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महासत्ता राष्ट्र म्हणून संपूर्ण जगात ओळख असणाऱ्या अमेरिकेत तर, पुढच्या काही वर्षांमध्ये अशा निर्मनुष्य आणि धडकी भरवणाऱ्या शहरांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल अशी माहिती एका निरीक्षणपर अहवालातून समोर आली आहे. झपाट्यानं होणारे हवामानातील बदल आणि लोकसंख्येत होणारी घट ही यामागची मुख्य कारणं असू शकतात असा तर्क या अहवालातून वर्तवण्यात आला आहे. 


शतकाअखेरीस होणार मोठा कायापालट 


अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार चालू शतकाच्या अखेरपर्यंत अमेरिकेतील जवळपास 30 हजार लहानमोठ्या शहरांतून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी स्थलांतर केलेलं असेल. या शहरांच्या लोकसंख्येमध्ये 12 ते 23 टक्क्यांनी घट होणार आहे. इथं जन्मदर शुन्यावर येईल असं नाही, पण चांगल्यातील चांगल्या हवामान असणाऱ्या शहरांमध्ये नागरिक स्थलांतर करतील, रोजगाराच्या शोधात नव्या शहरांच्या वाटा धरतील आणि पोट भरण्याची सोय असणाऱ्या शहरांच्या दिशेनं मोठ्या संख्येनं स्थलांतर होताना दिसेल असा अंदाज या आकडेवारीतून वर्तवण्यात आला आहे. 


सध्या सुस्थितीत दिसणाऱ्या शहरांतून पुढं नागरिक काही दूरच्या शहरांमध्ये स्थलांतरीत होतील. हे सर्वकाही रोखण्यासाठी आतापासूनच स्थानिक प्रशासनांच्या वतीनं आणि शहर नियजन मंडळांच्या वतीनं पावलं उचलण्याची गरज असल्याची बाब या अहवालातून अधोरेखित करण्यात आली आहे. 


नैसर्गिक आपत्ती एक मोठं आव्हान! 


नैसर्गिक आपत्तींमध्ये होणारी वाढ शेतीपिकांवर होताना दिसेल आणि याचे परिणाम रोजगार निर्मितीवरही होतील. कुठं भयावह उष्ण वातावरण आणि कुठं हिमवादळं, कुठं चक्रीवादळ तर, कुठं पूरस्थिती या अशा परिस्थिती आणि आपत्तींमुळं पिण्याच्या पाण्याचीही आबाळ होणार आहे. मुख्य शहरांच्या प्रवाहात सध्या नसलेल्या आणि कालांतरानं प्रगतीपथावर येणाऱ्या शहरांच्या दिशेनं मोठ्या प्रमाणात अमेरिकेतील नागरिकांचे पाय वळणार आहेत. 


हेसुद्धा वाचा : जोडप्यांना मुलं नकोत... चीनमध्ये अचानक लोकसंख्येत घट; जगभरात दिसणार परिणाम? 


 


शिकागोच्या युनिवर्सिटी ऑफ इलिनॉयमधील एका विद्यार्थ्यानं केलल्या निरीक्षणातून यासंबंधीचा अहवाल सादर करण्यात आला. या अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार 43 टक्के अमेरिकन नागरिक सध्या स्वत:च्या घराला मुकले आहेत. या शतकाच्या अखेरीकडे जसजसं जग वाटचाल करेल तसतसं हवामान बदलांची समस्या वाढून ही आकडेवारी 64 टक्क्यांवर पोहोचेल. याचे सर्वाधिक वाईट परिणाम अमेरिकेच्या उत्तर- पूर्व आणि मध्य- पश्चिम भागावर होणार आहेत. तर, टेक्सास आणि उटाहया विकसनशील शहरांची अवस्था 2100 मध्ये आणखी वाईट असणार आहे.