Missing Submarine Titan : टायटॅनिक (Titanic ) जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या आणि प्रवासाच्या सुरुवातीच्या 45 व्या मिनिटापासूनच संपर्क तुटलेल्या टायटन या पाणबुडीबाबतची मोठी अपडेट रॉयटर्सनं प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये 18 जून रोजी OceanGate या कंपनीच्या टायटन पाणबुडीतून प्रवास करणाऱ्या 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. कंपनीकडूनही या वृत्ताला दुजोरा देत त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून, त्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपूर्ण जगाचं लक्ष लागून राहिलेल्य़ा या घटनेला आता एक हळहळणारं वळण मिळालं असून, अमेरिकन तटरक्षक दलाच्या माहितीनुसार catastrophic implosion मुळं पाणबुडीचं नुकसान झालं असून, यातच पाचही प्रवाशांचा  मृत्यू ओढावल्याची माहिती मिळत आहे. 




कसा घेतला शोध?


कॅनडाच्या एका जहाजाशी जोडल्या गेलेल्या एका यंत्रमानवी उपकरणाच्या मदतीनं पाणबुडीच्या अपघातग्रस्त अवशेषांचा शोध सालण्यात आला. गुरुवारीच यासंदर्भातील माहिती समोर आली. समुद्रतळाशी साधारण 1600 फूट (488 मीटर) खोलवर टायटॅनिक जहाजाच्या एका टोकापासूनच काही अंतरावर अटलांटिक महासागराच्या उत्तरेला असणाऱ्या एका कोपऱ्यात या पाणबुडीचे अवशेष सापडले. 


हेसुद्धा वाचा : 'या' गावात प्रत्येकाला एकच किडनी; यामागे रहस्य की....? 


 


पाणबुडीचे पाच भाग या शोधमोहिमेत सापडल्याची अधिकृत माहिती सध्या मिळत असून, त्यामध्ये या 22 फूटांच्या पाणबुडीचे दोन तुकडे झाल्याचं सांगण्यात येत आहे. शिवाय यामध्ये प्रवास करणाऱ्या कोणत्याही प्रवाशासंदर्भातील माहिती किंवा अवशेष मात्र सापडू शकलेले नाहीत. दरम्यान, पाणबुडी आदळल्यामुळं ही दुर्घटना ओढावल्याची माहिती संबंधित शोधपथकाशी संबंधित अधिकारी देत आहेत. 


समुद्रात लुप्त झाले ते पाचजण... 


दरम्यान, अमेरिकन तटरक्षक दलानं पत्रकार परिषद घेत सदरील अपघाताची माहिती देण्यापूर्वीच पाणबुडीच्या ओशनगेट या कंपनीकडून प्रवाशांपैकी कुणीही हयात असल्याची आशा नसल्याचं म्हणत एक पत्रक जारी करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. या पाणबुडीमध्ये कंपनीचे संस्थापक आणि का CEO Stockton Rush यांच्यासह ब्रिटीश अब्जाधीश हामिश हार्डिंग, पाकिस्तानशी पाळंमुळं जोडलेले व्यावसायिक शहजादा दावूद आणि त्यांचा मुलगा सुलेमान आणि फ्रेंच oceanographer पॉल हेन्री नार्गोलेट यांचा समावेश होता. 


 


 


विविध देशांच्या अनेक बचाव पथकांनी या पाणबुडीचा शोध घेण्यासाठी गेल्या चार ते पाच दिवसांपासून शोधमोहिमा राबवल्या होत्या. यामध्ये खोल समुद्रात पाणबुडी शोधण्यासाठी विमानं आणि मोठ्या जहाजांची मदत घेण्यात आली होती. आता या पाणबुडीच्या अवशेषांचं संशोधन झाल्यानंतर नेमकी कोणती माहिती समोर येते याकडेच संपूर्ण जगाचं लक्ष असणार आहे.