Viral News : हल्ली Mainstream अर्थात प्रकाशझोतात असणाऱ्या पर्यटनस्थळांना भेट देण्यापेक्षा अधिक पसंती ही Offbeat ठिकाणांना दिली जाते. मात्र बऱ्याचदा ही निवड काहीशी चुकते. कारण, ऑफबिट किंवा कमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणी जाण्याच्या नादात   भटकंतीसाठी निघालेली ही मंडळी नकळत धोका पत्करत पुढे जात असतात. अनेकदा तर, पुढे येणाऱ्या धोक्याची त्यांना कुणकूणही नसते. सध्या अशात एका भटकंतीसाठी गेलेल्या जोडप्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यांच्या बचावासाठी हेलिकॉप्टरनं बचावपथक पोहोचलं आणि समोरील दृश्य पाहून तेसुद्धा हादरले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅलिफोर्नियात घडलेल्या एका घटनेमध्ये वाळवंटी प्रदेशात अडकलेल्या एका जोडप्याला Riverside County Sheriff कार्यालयाच्या बचाव पथकानं वाचवलं. कॅलिफोर्नियाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या जोशुआ ट्री नॅशनल पार्क इथं एक जोडपं हायकिंगसाठी गेलं असता संकटात सापडलं. पाण्यासाठी वणवण करणाऱ्या या जोडप्यावर एक वेळ अशी आली, की कुठंही सावली नसल्यामुळं तरुणानं स्वत:च तरुणीला झाकण्याचा प्रयत्न करत तिचा भीषण उकाड्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला, फॉक्स न्यूजनं यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं. 


नेमकं काय घडलं? 


बचाव पथकाच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार एका माणसानं 911 या क्रमांकावर संपर्क साधून आपण आपल्या प्रेयसीसह अतिशय अडचणीत सापडल्याचं सांगत शरीरातील पाण्याची पातळी खालावल्यामुळं अतिशय अशक्त झाल्याचं सांगत मदतीची मागणी केली. या फोननंतर यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी हेलिकॉप्टर पाठवण्याची व्यवल्था केली आणि तिथं पोहोचताच तळपत्या सूर्यकिरणांपासून निपचित पडलेल्या प्रेयसीचा बचाव करण्यासाठी प्रियकराची धडपड पाहून त्यांनाही धक्का बसला. 9 जून रोजी ही घटना घडल्याचं सांगितलं जातं. 


हेसुद्धा वाचा : Mhada Homes : म्हाडाच्या सोडतीची वाट पाहताय? 13000 घरांमुळं यंदा अनेकांचं नशीब फळफळणार


रिवरसाईड काऊंटी शेरिफच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून यासंदर्भातील व्हिडीओ शेअर करत बचावकार्यादरम्यान नेमकं काय घडलं आणि या जोडप्याला एअरलिफ्ट कसं करण्यात आलं याची माहिती दिली. बचाव पथकातील जवानांच्या माहितीनुसार अशा ठिकाणांवर जाताना ही मंडळी पुरेसा पाणीसाठा सोबत बाळगत नाहीत. यांच्यासोबतही असंच घडलं. अनेक किलोमीटरचं अंतर ओलांडल्यानंतर जेव्हा शरीराला पाण्याची आवश्यकता भासते तेव्हा परतीचा प्रवासही अशक्य असतो आणि असा एखादा जीवघेणा प्रसंग ओढावतो.


कॅलिफोर्नियामध्ये घडलेला हा प्रसंग पाहता भारतातही प्रवासाकडे अनेकांचा वाढता ओघ पाहता, ही आवड जोपासण्यासोबतच सतर्क राहणंही तितकंच आवश्यक असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळं मनसोक्त फिरा पण... सतर्क राहा!!!