अमेरिकेत मृतांचा आकडा 2 हजारांवर; जगभरात ६ लाख ६० हजारांवर रुग्ण, ३० हजारांवर मृत्यू
जगभरात कोरोनाचा कहर वाढतोच आहे.
नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा कहर वाढतोच आहे. चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने अनेक देशात थैमान घातलंय. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस मृतांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होत आहे. चीनमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळल्यानंतर अमेरिका आणि इटलीमध्ये आता कोरोनाने प्रचंड थैमान घातलंय. शनिवारी इटलीमध्ये कोरोना व्हायरसने मृतांचा आकडा तब्बल १०,०००वर गेला आहे.
अमेरिकेत कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची संख्या सर्वाधिक असून शनिवारी १२२,००० हून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अमेरिकेत मृतांची संख्या दोन हजारांपेक्षा अधिकवर पोहचली आहे.
स्पेनमध्ये, कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 5690 वर पोचला आहे.
जगभरात कोरोाना रुग्णांची संख्या 6 लाख 60 हजारांवर गेली आहे. तर आतापर्यंत 30,000 हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असताना दुसरीकडे कोरोना रुग्ण बरे होत असल्याचं दिलासादायक चित्रही आहे. जगभरात आतापर्यंत 139,000 लोक बरे झाल्याची माहिती आहे.