वॉशिंग्टन : अमेरिकेने पाकिस्तानला आणखीन एक मोठा झटका दिला आहे. दहशतवादी कारवाया करणा-या हिजबुल मुजाहिद्दीनला अमेरिकेने दहशतवादी संघटना घोषित केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेने यापूर्वीच हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचा म्होरक्या सईद सलाहुद्दीनला जागतिक दहशवादी घोषित केलं आहे. त्यानंतर आता अमेरिकेने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. 


अमेरिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानला एक मोठा झटका बसला आहे. पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच दहशतवाद्यांचं समर्थन केलं आहे. 


आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्याला समोर आणणा-या भारताच्या प्रयत्नांना एक प्रकारे यश आलं आहे.



अमेरिकेने हिजबुल मुजाहिद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना घोषित केल्यामुळे हिजबुलची मोठी कोंडी झाली आहे.