US Election 2020: आणखी 2 राज्यात जो बायडेन यांची आघाडी, ट्रम्प यांना धक्का
जो बायडेन यांची आघाडी...
वॉशिंग्टन : यूएस न्यूज नेटवर्कच्या माहितीनुसार जो बायडेन पेनसिल्व्हेनिया आणि जॉर्जियामध्ये आघाडीवर आहेत. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ते विजयाच्या जवळ पोहोचले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मागे ठेवून डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी जॉर्जिया आणि पेनसिल्व्हेनियामध्ये अधिक पकड मजबूत केली आहे. यासह, बायडेन या शर्यतीत व्हाईट हाऊसच्या आणखी जवळ पोहोचले आहेत. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या माहितीनुसार, बायडेन यांना आतापर्यंत 253 मतदार मते मिळाली आहेत तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 214 मते आहेत.
निकालांच्या दृष्टीने पाच राज्ये महत्त्वाची
अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या अंतिम निकालांमध्ये पाच राज्ये महत्त्वपूर्ण ठरली आहेत. या प्रांतांच्या निकालावर सगळ्यांचं लक्ष केंद्रित झालं आहे. पेनसिल्व्हानिया, जॉर्जिया, उत्तर कॅरोलिना, नेवाडा आणि अलास्का येथे मतमोजणी सुरू आहे. बहुतांश प्रांतातील परिस्थिती साफ झाली आहे.
न्यूयॉर्क टाइम्सच्या माहितीनुसार निवडणूक प्रचारादरम्यान डेमोक्रेटने जॉर्जियावर जास्त लक्ष देखील दिलं नव्हतं. जो बायडेन यांनी निवडणुकीच्या आधी राज्याचा दौरा देखील केला नव्हता. पण आता ते या ठिकाणाहून आघाडीवर आहेत. त्यामुळे ट्रम्प यांचा विजय आता आणखी कठीण वाटत आहे.