वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष (American presidency) कोण होणार याची उत्सुकता गेले काही दिवस होती. अखेर जो बायडेन (Joe Biden) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा पराभव केला आहे. ते अमेरिकेचे ४६ चे राष्ट्राध्यक्ष ((American presidency) झाले आहेत. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक (US election 2020 ) निकालाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. त्यातच आपण ही निवडणूक आपण जिंकलो आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. परंतु ट्विटरने हे ट्विट नाकारले. अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अमेरिकेतील जवळपास सर्वच मीडियाने बायडेन विजयी झाल्याचे म्हटले आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव स्विकारण्यास नकार दिला आहे. आपण या निवडणुकीविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे म्हटले आहे. बायडेन यांना २८४ तर ट्रम्प यांना २१४ इतकी मते मिळाली. अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बायडेन विक्रमी मतांनी विजयी झालेत. बायडेन यांना सात कोटींहून जास्त मते मिळाली आहेत. बायडेन यांच्या विजयामुळे अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी कमला हॅरीस यांनी निवड होणार हे आता स्पष्ट झाले आहे.



मी जिंकलोय - ट्रम्प


मी ही निवडणूक जिंकलोय, असे आश्चर्यकारक ट्विट अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. त्यामुळे संभ्रमाचं वातावरण निर्माण झाले. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा अधिकृत निकाल अद्याप जाहीर झालेला नाही. त्यात ट्रम्प यांनी हे ट्विट केल्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय. 




दरम्यान, ट्विटरने लागोपाठ तिसऱ्यांदा ट्रम्प यांचं ट्विट फ्लॅग करून आक्षेप नोंदवला आहे. तर दुसरीकडे जो बायडेन यांनीही आपणच विजयी होणार, अशी खात्री व्यक्त केली होती. अमेरिकेतील डेलावेअर शहरात राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात बायडेन यांनी आपला विजय निश्चित असल्याचा पुनरुच्चार केला. आकड्यांवरुन विजयाची खात्री असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांच्या टीमने व्हाईट हाऊसमधील तयारीचा आढावा घेण्यास सुरूवात केली. तर उपाध्यपदाची निवडणूक लढणाऱ्या कमला हॅरिस यांनी काही तज्ज्ञांच्या भेटीगाठी सुरू केल्या.


जो बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील.  डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना पराभवाचा दे धक्का दिला आहे. ट्रम्प यांच्या ट्विटनंतर जो बायडेन विजयी झाल्याचे वृत्त सीएनएन, एपी (The Associated Press) ने दिले. एपीने जो बायडेन हे अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्याचे म्हटले आहे. आरोग्य, आर्थिक आणि सामाजिक संकटांच्या ऐतिहासिक धक्क्यातून ते देशाला बाहेर काढतील असे म्हटले आहे.