ऑपरेशन कायला म्यूलर: बगदादीला ठार करत अमेरिकेने घेतला या तरुणींच्या हत्येचा बदला
दशतवादी संघटना ISIS चा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी ठार झाला आहे.
मुंबई : दशतवादी संघटना ISIS चा म्होरक्या अबू बक्र अल बगदादी ठार झाला आहे. त्याला ठार करत अमेरिकेने बदला पूर्ण केला आहे. रात्री उशिरा चालवण्यात आलेल्या या कारवाईत तो ठार झाला आहे. या ऑपरेशनचं नाव कायला म्यूलर ठेवण्य़ात आलं होतं. कायला म्यूलर ही २६ वर्षाची तरुणी होती. बगदादीने २०१५ मध्ये या अमेरिकन तरुणीवर बलात्कार करुन तिची हत्या केली होती. अमेरिकेमध्या या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत होता. त्यानंतर आता अमेरिकेने कायला म्यूलरचा बदला घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
बगदादी ठार झाल्याची बातमी कळताच कायला म्यूलरचे आई-वडील भावुक झाले. ही कारवाई केल्यामुळे त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. सुरुवातीला ही बातमी अनेकांना खरी वाटत नव्हती. कारण या आधी देखील बगदादी मारला गेल्याची बातमी आली होती. पण जेव्हा राष्ट्राध्य़क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची अधिकृत घोषणा केली तेव्हा अनेकांना या गोष्टावर विश्वास बसला.
बगदादी ठार झाल्यानंतर जगाला संबोधित करताना ट्रम्प यांनी म्हटलं की, "जरा विचार करा बगदादी आणि त्याच्या मुलांनी कायला सोबत काय-काय केलं. त्यांची तिच्यावर किती अत्याचार केले.'
१९८८ मध्ये जन्म झालेली कायला मानवाधिकार कार्यकर्ता होती. २०१२ मध्ये ती तुर्कस्थान आणि सीरीयामध्ये युद्धग्रस्त भागात मदतीसाठी गेली होती. २०१३ मध्ये सीरियाच्या एलेप्पोमध्ये ISIS च्या दहशवताद्यांनी तिला पकडलं. परिस्थिती खराब होतांना पाहताच ती या शहरातून जात असताना दहशतवाद्यांनी तिच्या गाडीवर हल्ला करुन तिला बंदी बनवलं.
ISIS च्या दहशतवाद्यांनी तिच्यावर अनेक अत्याचार केले. अमेरिकन मीडिया रिपोर्टनुसार, मुलरवर अनेकदा बलात्कार झाले. बगदादीने देखील तिच्यावर अत्याचार केले. न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार बगदादीने म्यूलर सोबत जबरदस्ती विवाह करत तिच्यावर अनेकदा बलात्कार केले.
शारीरिक अत्याचार आणि मानसिक त्रास सहन करत कायला १८ महीने ती ISIS च्या कैदेत होते. पण २०१५ मध्ये तिचा मृत्यू झाला. तिचा मृत्यू हा जॉर्डनच्या हवाई हल्यात झाला की दहशतवाद्यांनी तिची हत्या केली हे अजून समोर आलं नाही. पण १० फेब्रुवारी २०१५ ला म्यूलरच्या कुटुंबाकडून तिच्या मृत्यूची माहिती मिळाली. ISIS ने एक इमेल करत तिच्या शरीराचे ३ भागाचे फोटो पाठवले होते.